धक्कादायक! TMKOC निर्मात्याविरोधात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली तक्रार दाखल

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोची सतत चर्चा सुरु असते. या शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) हिने सिरीयलचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. असित कुमार मोदी यांच्याबरोबर अभिनेत्रीने (Actress) प्रोजेक्ट […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 11T160724.289

Jennifer Mistry Bansiwal

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोची सतत चर्चा सुरु असते. या शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) हिने सिरीयलचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. असित कुमार मोदी यांच्याबरोबर अभिनेत्रीने (Actress) प्रोजेक्ट हेड सोहेल रामानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्या विरोधामध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर मिस्त्रीने दोन महिन्यांपासून शूटिंगपासून स्वत:ला लांब ठेवली आहे. 7 मार्च ला ती शेवटची सेटवर दिसून आली असल्याची माहिती मिळाली आहे. सोहेल आणि जतिन बजाज यांनी अभिनेत्रीचा अपमान केला होता, त्यानंतर ती सेटवरून परतली होती. या सर्व प्रकरणाबद्दल जेनिफर मिस्त्री बन्सीवालसोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला पण तिने याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. पण तिने शो सोडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.’माझा शेवटचा एपिसोड ६ मार्चला आला असल्याचे जेनिफरने अशी माहिती दिली आहे.

सेटवर प्रोजेक्ट हेड सोहेल रामानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतीन बजाज यांनी माझा अपमान केल्याचा खुलासा तिने यावेळी केला आहे. तसेच 7 मार्चला माझ्या लग्नानचा वाढदिवस होता. त्या दिवशी होळी होती, त्यादिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्री म्हणाली, मी चार वेळा सुट्टीसाठी विचारले, पण त्यांनी मला सुट्टी दिली नसळायचे तिने यावेळी सांगितले आहे.


कारण त्यांना मला जाऊ द्यायचं नव्हतं. सोहेलने जबरदस्तीने माझी गाडी थांबवली होती. मी त्यांना असेही सांगितले होते की, मी या सिरीयलमध्ये १५ वर्षे झाले काम केले आहे, आणि माझ्यावर अशी सक्ती करू शकत नाही. यानंतर सोहेलने मला यावर धमकी देखील दिली होती. मी असित कुमार मोदी, सोहेल रामानी आणि जतिन बजाज यांच्याविरोधामध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ची सहाव्या दिवशीही छप्पर फाड कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

तसेच जेनिफरने पुढे सांगितले आहे की, मी टीमला अगोदरच सांगितले होते की, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मला त्या दिवशी हाफ डे पाहिजे. माझी एक मुलगी देखील आहे. जी होळीसाठी माझी वाट बघत होती. पण निर्मात्यांनी मला जाऊ दिले नाही. २ तासांच्या विश्रांतीनंतर परत येईन, असेही मी सांगितले होते. पण त्यांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. ते अनेकदा मेल पुरूष कलाकारांना कामत सुटत देत होता, पण महिलांना नाही. या शोमधील लोक अ पुरुषी हुकुमत गाजवणारे आहेत.

जतीनने जबरदस्तीने माझी गाडी थांबवली होती. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद देखील झाला आहे. ही धक्कादायक घटना ७ मार्च रोजी घडली होती. मला वाटले की हे लोक मला फोन करणार, पण २४ मार्चला सोहेलने मला नोटीस पाठवली की मी शूटिंग सोडून गेली आहे. त्यामुळे तो माझे पैसे कापत आहे. त्यांनी मला या प्रकरणावर घाबरवले असल्याचे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे.

Exit mobile version