Phula : वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या “फुला” चित्रपाटाचा टीजर लाँच

Phula : वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या फुला या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे

Phula

Phula

Phula : वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या फुला या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे यांच्या धीरगंभीर आवाज असलेल्या टीजरने लक्ष वेधून घेतले असून 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीचा चित्रपटाने आता उत्सुकता निर्माण केली आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.

“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. साखळदंडानी बांधलेली, जमिनीवर आडवी झालेली, आजुबाजूला हळद पडलेली अशी फ्रेम, सुबोध भावे यांच्या आवाजात यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता या संस्कृत ओळींनी सुरू होणारा टीजर लक्ष वेधून घेतो. त्यानंतर एका मागोमाग एक देखण्या दृश्यप्रतिमांतून या चित्रपटाचा पोत कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. एका मुलीच्या अस्तित्वावर निर्माण होणारा समाजाचा प्रश्न हा या चित्रपटातून मांडला जाणार आहे. त्यामुळे टीजरपासूनच या चित्रपटाने उत्सुकता निर्माण केली आहे.

BCCI ला मोठा धक्का; IPL 2026 दरम्यान खेळली जाणार ODI आणि T20 मालिका, वेळापत्रक जाहीर-

Exit mobile version