नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

Maya हा नवा चित्रपट भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. टीझरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली.

Maya

Maya

Teaser released of ‘Maya’, which explores the psychology of relationships : नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

उपेंद्र लिमयेची खलनायकी भूमिका! ‘मन आतले मनातले’ चा ॲक्शनपॅक्ड टीजर लाँच

टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.

राणीच्या 30 वर्षांच्या आयकॉनिक प्रवास साजरा करण्यासाठी संपूर्ण इंडस्ट्री एकत्र रणबीरने म्हणाला…

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचं प्रभावी प्रतिनिधित्व करतात. तर गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.

भिडेंच्या विखारी वक्तव्यांची तोफ; शरद पवारांवरील वक्तव्यानंतर अटकेची मागणी जोरात!

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ‘’बर्‍याच वेळा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्यालाच आपण संपूर्ण आयुष्य समजतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपण खूप काळ घालवतो. काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा एकदा पुढे सरकायला लागतं. ‘माया’ हा चित्रपट याच भावनिक प्रवासावर भाष्य करतो.”

शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारतर्फे मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी तरीही खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Exit mobile version