Download App

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मध्ये सलमान खानच जिंकल मन

Ankita Lokhande Post: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या बिग बॉस 17 मधून (Bigg Boss 17) सगळ्यांचं मन जिंकत आहे. तिची चांगली वागणूक आणि चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. आता तिने थेट चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) मनात देखील घर केलं आहे आणि भाईजानने याच कौतुक देखील केल्याचे बघायला मिळाले आहे.


लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील तिचा अप्रतिम प्रवास हा सगळंच दाखवत असताना ती खंबीर खेळत आहे. या शोमध्ये होस्ट सलमान खानने देखील अंकिताची तिच्या प्रभावी उपस्थितीबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. तिच्या चांगल्या वागणुकीची आणि सहजतेने तणाव हाताळण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली आहे. अभिनेत्रीच्या टीमने व्हिडिओ क्लिप तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. आणि कॅप्शन लिहिले आहे की, “काही लोक फक्त खेळ खेळतात पण काही लोकांची मने जिंकतात. ती त्या दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे, तिने सर्वांचे प्रेम आणि हृदय जिंकले आहे, अगदी @beingsalmankhan 💙कडून @colorstv @officialjiocinema @endemolshineind अशी पोस्ट यावेळी तिने केली आहे.

अंकिता लोखंडेने मन जिंकणे सुरूच ठेवले आहे आणि बिग बॉस 17 मध्ये अनोखी छाप सोडली आहे. तिचा प्रवास एक प्रेरणा देणारा आहे, जो दाखवून देत आहे की, स्वतःशी खरे राहणे आणि कठीण परिस्थितीवर मत कशी करायची. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Traffic Rules: रजनीकांतच्या नातवाने रस्त्यावर असं काही केलं की वाहतूक पोलिसाने ठोठावला दंड

अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या सिरियलच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या सिरियलच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या सिरियममध्ये ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या सिरियलच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण काही कारणांनी त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला.

अंकिता लोखंडे यांनी 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘बागी 3′,’मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमांत अंकिताच्या अभिनयाची झलक बघायला मिळाली आहे. अंकिता लोखंडेने साकारलेली अर्चना आज घराघरांत लोकप्रिय आहे.

Tags

follow us