Jui Gadkari: मराठी अभिनेत्री जुई गडकरी सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘ठरलं तर मग’ या सिरीयलमध्ये कायम तिचा हटके लूक बघायला मिळत असतो. यामध्ये जुई ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. (Tharala Tar Mag Fame Jui Gadkari) मध्यंतरी आजारपणामुळे अभिनेत्रीने कलाविश्वातून छोटासा ब्रेक घेतल्याचे बघायला मिळाले होते. (Marathi serial) परंतु, ‘ठरलं तर मग’ या सिरीयलद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रामध्ये दमदार पुनरागमन केल्याचे बघायला मिळाले.
सीरियलमध्ये मंगळागौरीचं शूटिंग सुरु असताना जुई (Social media) आणि तिचा सहकलाकार अमित भानुशालीने मीडियाला एक माहिती दिली आहे. यावेळी जुई गडकरीने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाच्या तारखेविषयी मोठा खुलासा केला आहे. जुई गडकरी साकारत असलेल्या ‘सायली’ या पात्राला चाहत्यांनी भरभरून प्रेम देत आहे. सायलीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. अलीकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जुईने खऱ्या आयुष्यात लग्न केव्हा करणार? याविषयी स्पष्टच सांगितले आहे.
जुई आणि तिचा सहकलाकार अमित भानुशाली हे दोघंही एकमेकांचे चांगले आणि जवळचे मित्र असल्याने अमितला तिच्या लग्नाची तारीख काय असा सवाल करण्यात आला. यावर अभिनेत्याने २४ फेब्रुवारी २०२४ असं उत्तर दिल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु अमितने सांगितलेली तारीख दुरुस्त करत जुई म्हणाली आहे की, अमित थोडासा चुकला आहे कारण, लग्नाची तारीख ४ आहे… महिना फेब्रुवारीचं राहणार आहे. यंदा माझा व्हॅलेंटाईन डे जरा जोरदार साजरा करणार आहे.
Wedding ठरलं! ‘या’ दिवशी परिणीती होणार ‘मिसेस चड्डा’; राजस्थानमध्ये शुभमंगल सावधान पडणार पार
“मी माझ्या जोडीदाराला सगळ्यात मौल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणून देणार आहे…माझा वेळ आणि माझं संपूर्ण आयुष्य. असं जुईने यावेळी सांगितले आहे. परंतु अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगितले नाही. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही सिरीयल पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये जोरदार घोडदौड करत असल्याचे दिसत आहे. या सीरियलमध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.