भोजपुरी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठे (Bhojpuri) सुपरस्टार एकाच टेबलावर एकत्र आले की, तो केवळ पुनर्मिलाप राहत नाही, तर तो बनतो ‘बवाल’२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रीमियरपूर्वी JioHotstar आणि Colors यांनी ‘भोजपुरी बवाल’ ची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. ही झलक प्रेक्षकांना आगामी धमाल, मैत्री, बेधडक संवाद आणि अनपेक्षित घडामोडींची रोमांचक चुणूक दाखवते.
व्हिडिओची सुरुवात कलाकार एका डिनर टेबलवर बसून शोची ओळख प्रेक्षकांना कशी करून द्यायची यावर चर्चा करत असल्याने होते. मात्र काही क्षणांतच संभाषण अनपेक्षित वळण घेते. हलक्याफुलक्या गप्पांचे रूप वादात बदलते, चेष्टा आरोपांपर्यंत पोहोचते आणि कलाकार एकमेकांबद्दलच्या अफवा, वाद आणि लोकांमध्ये असलेल्या समजुतींवर खुलेपणाने चर्चा करू लागतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, जेव्हा भोजपुरीतील सर्वात मोठे स्टार्स एकत्र येतात, तेव्हा बवाल अटळ असतो.
सेलिब्रिटी, रिअॅलिटी आणि मनोरंजन यांच्यातील सीमा धूसर करणारी ही झलक प्रेक्षकांना ‘भोजपुरी बवाल’* ची अनस्क्रिप्टेड केमिस्ट्री, मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव आणि बिनधास्त प्रामाणिकपणाची ओळख करून देते. आणि जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की आता यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही, तेव्हाच निरहुआ शेवटी एक अशी घोषणा करतात जी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते ये भोजपुरी बवाल, बिग बॉस के ऊपर जाएगा.” हा केवळ आत्मविश्वास आहे की खरोखरच एक मोठा दावा, याचं उत्तर प्रेक्षकांना २ ऑगस्टपासून मिळेल.
कॉकटेल नंतरही या 10 कारणांमुळं दीपिका पदुकोण आजही बॉलिवूडची अल्टिमेट कूल आणि मॉडर्न आयकॉन ठरते
टास्क आणि एलिमिनेशनवर आधारित पारंपरिक रिअॅलिटी शोच्या चौकटीपासून वेगळा, ‘भोजपुरी बवाल’ भोजपुरी मनोरंजनविश्वातील दिग्गज कलाकारांच्या खऱ्या आयुष्याचा जवळून मागोवा घेतो. प्रसिद्धी, महत्त्वाकांक्षा, कुटुंब, मैत्री, स्पर्धा आणि सुपरस्टारडमसोबत येणाऱ्या दबावाचा ते कसा सामना करतात, याचा अनोखा प्रवास या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. करोडो प्रेक्षकांना अनेक वर्षे आकर्षित करणाऱ्या, पण पडद्यामागे राहिलेल्या या सेलिब्रिटी विश्वाची अभूतपूर्व झलक हा शो देणार आहे.
यावेळी पवन सिंह म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत लोकांनी आमच्याबद्दल असंख्य गोष्टी ऐकल्या आहेत. काही खर्या होत्या, काही अतिशयोक्तीपूर्ण आणि अनेक पूर्णपणे बनावट. हा शो प्रेक्षकांना हेडलाइन्सच्या पलीकडे जाऊन आमची खरी ओळख करून देईल. या झलकमध्ये तुम्ही जे पाहिलं, ती तर फक्त सुरुवात आहे.
दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ म्हणाले, भोजपुरी बवालची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथे कोणीही स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही एकत्र हसतो, वाद घालतो, एकमेकांची खिल्ली उडवतो आणि मनमोकळेपणाने बोलतो. त्यामुळेच हा प्रवास खरा वाटतो. आणि हो मी शेवटी जे बोललो, त्याचं उत्तर प्रेक्षक २ ऑगस्टपासून स्वतः देतील. आम्रपाली दुबे म्हणाल्या, “लोकांना वाटतं की त्यांनी आमचं काम अनेक वर्षे पाहिलं आहे, त्यामुळे ते आम्हाला ओळखतात. पण कॅमेऱ्यामागेही खूप काही घडत असतं. ‘भोजपुरी बवाल’ ही आमची ती बाजू प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी आहे.
काजल राघवानी म्हणाल्या, हा शो कृत्रिम ड्रामा निर्माण करण्यासाठी नाही. कॅमेरे बंद झाल्यानंतर घडणारे नातेसंबंध, संवाद आणि व्यक्तिमत्त्वांचे खरे पैलू दाखवण्यासाठी आहे. हाच या शोचा वेगळेपणा आहे. तेज प्रताप यादव म्हणाले, भारताच्या हृदयभूमीतील कथा नेहमीच मोठ्या व्यासपीठाच्या पात्र राहिल्या आहेत. हा शो त्या भावनेला प्रामाणिकपणे सादर करतो आणि अशा व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणतो, ज्यांना प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही अशा स्वरूपात एकत्र पाहिलेले नाही.” भोजपुरी बवाल’चा प्रीमियर २ ऑगस्टपासून JioHotstar आणि Colors वर होणार आहे.
