अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली (Film) आणि अरशद वर्सी, विक्रांत मॅसी, वीर हिरानी, मोना सिंग आणि बोमन इरानी यांच्या प्रमुख भूमिकांनी सजलेली ही मालिका 3 जुलैपासून फक्त जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.
मुंबई, 15 जून 2026: पहिल्या लूकनंतर प्रेक्षकांच्या मनात अधिक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यांची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर आज जिओहॉटस्टारने प्रीतम अँड पेड्रोचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ह्यूमर, रहस्य, गोंधळ आणि अनपेक्षित भागीदारीने भरलेला हा प्रवास प्रेक्षकांना एक भन्नाट मनोरंजनाचा अनुभव देणार आहे.
गोव्याच्या रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर घडणारी प्रीतम अँड पेड्रो ही मालिका दोन पूर्णपणे वेगवेगळ्या जगांची टक्कर दाखवते. कथेच्या केंद्रस्थानी आहे पेड्रो इंस्टिंक्टवर चालणारा जुना पद्धतीचा पोलीस अधिकारी, आणि प्रीतम तंत्रज्ञानात पटाईत असलेला तरुण. हे दोघे एका अशा रहस्यात अडकतात जे त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं, विचित्र आणि अनपेक्षित आहे. त्यांचा प्रवास जसजसा पुढे सरकतो, तसतशी गुपितं अधिक गहिरी होतात, निष्ठा तपासल्या जातात आणि प्रत्येक वळणावर गोंधळ निर्माण होतो.
मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले; असं असणार नवं कार्यकारी संचालक मंडळ
राजकुमार हिरानी यांनी निर्माण केलेली आणि ख्यातनाम दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका अरशद वर्सी, विक्रांत मॅसी, वीर हिरानी, मोना सिंग आणि बोमन इरानी यांच्या प्रमुख भूमिकांनी सजलेली आहे. राजकुमार हिरानी यांच्या खास उबदार आणि मानवी स्पर्शासोबत ह्यूमर, रहस्य आणि आधुनिक थीम्सची सांगड घालणारी प्रीतम अँड पेड्रो ही मालिका स्ट्रीमिंग प्रेक्षकांसाठी एक ताजेतवाने आणि रोमांचक अनुभव ठरणार आहे.
आलोक जैन, हेड – हिंदी आणि इंग्रजी एंटरटेनमेंट बिझनेस (स्ट्रीमिंग, टीव्ही आणि स्टुडिओज) म्हणाले: “महान कथा सांगणे ही काही लोकांची मक्तेदारी नसावी, ती सर्वांसाठी असावी. आम्ही असे कंटेंट तयार करत आहोत जे लोकांच्या आयुष्याचा भाग बनते प्रवासात, संध्याकाळच्या विश्रांतीत, कुटुंबासोबतच्या वेळेत. सर्वोत्तम पात्रं पडदा काळा झाल्यानंतरही आपल्या सोबत राहतात, आणि प्रीतम अँड पेड्रोमध्ये प्रेक्षकांना अशीच दोन अविस्मरणीय पात्रं मिळतील. ही दुनिया मजेदार, आश्चर्यकारक आणि मनाला भिडणारी आहे. राजकुमार हिरानीसारखे फार थोडे कथाकार सातत्याने अशी जादू निर्माण करतात. त्यांच्या कथा पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत, आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या दर्जाच्या निर्मात्याला आम्ही स्ट्रीमिंगसाठी आणत आहोत. कथाकथन हे केंद्रस्थानी ठेवून, आजच्या प्रेक्षकांच्या जीवनशैलीनुसार तयार केलेली प्रीतम अँड पेड्रो मालिका जिओहॉटस्टारवर आम्ही कशी बांधणी करत आहोत याचं उत्तम उदाहरण आहे.”
राजकुमार हिरानी म्हणाले: “या कथेत मला सर्वात जास्त उत्साहित केले ते म्हणजे तिच्या केंद्रस्थानी असलेलं नातं. प्रीतम आणि पेड्रो हे पूर्णपणे वेगवेगळ्या जगातून आलेले आहेत आणि आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, पण त्यांना एकत्र प्रवास करावा लागतो. मला नेहमीच अशा कथांकडे ओढ वाटते ज्या माणसांबद्दल असतात — त्यांच्या विरोधाभासांबद्दल, कमकुवतपणाबद्दल आणि प्रवासात निर्माण होणाऱ्या अनपेक्षित नात्यांबद्दल. या मालिकेत आम्हाला हे सगळं शोधता आलं आणि त्याचबरोबर पात्रं आणि जगाशी मजा करता आली. मला आनंद आहे की प्रेक्षकांना अखेर अनुभव जिओहॉटस्टारवर घेता येणार आहे.”
अविनाश अरुण म्हणाले: “प्रीतम अँड पेड्रोमध्ये मला सर्वात जास्त आकर्षित केले ते म्हणजे ही कथा सतत तुम्हाला आश्चर्यचकित करते. ही मालिका ह्यूमर आणि गोंधळाने भरलेली आहे, पण त्याचबरोबर ती मानवी नात्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे. आम्हाला असं जग तयार करायचं होतं जे एकाच वेळी गुंतवून ठेवणारं, मनोरंजक आणि भावनिकदृष्ट्या भिडणारं असेल. या पात्रांना जिवंत करण्याचा अनुभव आणि अशा दमदार कलाकारांसोबत काम करण्याची संधी खूपच समाधानकारक ठरली.”
अरशद वर्सी म्हणाले: “पेड्रो हा असा पात्र आहे जो आयुष्याबद्दल फार विचार करत नाही; तो आपल्या इंस्टिंक्टवर विश्वास ठेवतो, मनाचं ऐकतो आणि अनेकदा अशा परिस्थितीत अडकतो जिथे त्याला नसावं. मला या शोमध्ये सर्वात जास्त आवडले ते म्हणजे त्याचा वेडेपणा, ह्यूमर आणि प्रवासातील अनपेक्षित वळणं. मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही कथा उलगडताना खूप मजा येणार आहे.”
विक्रांत मॅसी म्हणाले: “या मालिकेकडे मला सर्वात जास्त आकर्षित केले ते म्हणजे ती एकाच वेळी किती लेयर्ड आणि मनोरंजक आहे. यात ह्यूमर आहे, रहस्य आहे, भावना आहेत आणि अनेक अनपेक्षित वळणं आहेत. प्रत्येक पात्राचं स्वतःचं अजेंडा आहे, स्वतःचे दोष आहेत आणि स्वतःचा प्रवास आहे, ज्यामुळे ही दुनिया खूप जिवंत वाटते. अशा अनोख्या प्रकल्पाचा भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी ठरलं.”
वीर हिरानी म्हणाले: “या प्रवासात माझ्यासाठी सर्वात मोठा विशेषाधिकार म्हणजे उद्योगातील उत्तम कलाकार आणि कथाकारांकडून शिकण्याची संधी. सेटवरील प्रत्येक दिवस मास्टरक्लाससारखा होता अरशद सर सहजपणे एखाद्या सीनमध्ये ह्यूमर आणतात, विक्रांतचा अप्रतिम बारकाईने केलेला अभ्यास, मोना मॅडमची उबदारता आणि स्पॉन्टेनिटी, तसेच अविनाश सरकडून कॅमेऱ्यामागे शिकण्याचा अनुभव. मी अभिनेता म्हणून शिकण्याची, वाढण्याची आणि स्वतःचं स्थान शोधण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद आहे की प्रेक्षकांना अखेर प्रीतम अँड पेड्रोचं जग अनुभवता येणार आहे.”
ह्यूमर, रहस्य, भावना आणि साहस यांचा अनोखा संगम असलेली प्रीतम अँड पेड्रो मालिका प्रेक्षकांना एक अत्यंत आकर्षक अनुभव देण्याचं वचन देते. ही कथा एकीकडे वास्तवाशी जोडलेली आहे तर दुसरीकडे सर्वांना भावणारी सार्वत्रिक मनोरंजनाची ताकदही तिच्यात आहे.
