फ्रेमच्या दिग्दर्शकांनी शेअर केल्या खास गोष्टी! चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Frame या चित्रपटाचं खरं यश म्हणजे प्रेक्षकांना प्रेस फोटोग्राफरसोबत अक्षरशः रस्त्यावर घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी झालो.

Frame

Frame

The directors of ‘Frame’ share some special insights film is set to reach audiences soon : “फ्रेम’ची कल्पना एखाद्या खऱ्या घटनेतून, छायाचित्रातून किंवा बातमीतून सुचली होती का? या बद्दल बोलताना ते सांगतात विशेषतः एखाद्या छायाचित्रातून किंवा घटनेतून ही कल्पना सुचली असं नाही. पण पुण्यात मी पाच वर्षे प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत असताना या क्षेत्राबद्दल अनेक गोष्टी जवळून अनुभवल्या. प्रत्येक फोटो जर्नालिस्टच्या मनात काय चालत असतं, एका दिवसात किंवा एका टप्प्यात तो किती वेगवेगळ्या जगांमधून प्रवास करत असतो, ही गोष्ट मला खूपच आकर्षक वाटली.

‘अल्फा’ मधील आलिया आणि शर्वरीचा ‘मॅसॅकर’ हा प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ वायआरएफकडून प्रदर्शित!

अर्थात, आजही माझ्या मनात ताज्या असलेल्या अनेक घटना आहेत. मग तो पुणे बॉम्बस्फोट असो, कॉमनवेल्थ यूथ गेम्स असोत किंवा आयपीएलचं कव्हरेज असो. अशा अनेक अनुभवांनी माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवला. पण एखादी एकच घटना नाही, तर या संपूर्ण प्रवासानेच मला ही कथा सांगण्याची प्रेरणा दिली. या व्यवसायातील आणि आयुष्यातील अनिश्चितता, क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती, हे मला पडद्यावर मांडण्यासारखं वाटलं.

पवना धरण 55 टक्के भरले पण वीज खंडित झाल्याने पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा विस्कळीत

चित्रपटातील असा कोणता प्रसंग किंवा क्षण आहे, ज्यातून तुम्ही उभं करू इच्छित असलेलं विश्व सर्वात प्रभावीपणे दिसून येतं? तो खास का आहे? या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांवर माझा पूर्ण विश्वास होता. संपूर्ण टीमने आणि कलाकारांनी आम्ही जे पडद्यावर आणू इच्छित होतो, त्याचं सार अतिशय प्रभावीपणे साकारलं.

Rohit Pawar On NDA :  शरद पवार NDA सोबत जाणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माझ्यासाठी या चित्रपटाचं खरं यश म्हणजे प्रेक्षकांना प्रेस फोटोग्राफरसोबत अक्षरशः रस्त्यावर घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी झालो. प्रेक्षकांना एखाद्या घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव मिळतो, आणि हीच गोष्ट मला सर्वात जास्त आनंद देते. फ्रेम १० जुलै पासून झी ५ मराठीवर बघायला विसरू नका !

Exit mobile version