first glimpse of ‘Mysa’ will be released on December 24th : रश्मिका मंधाना यांच्या आगामी चित्रपट ‘मायसा’ बाबत प्रेक्षकांमध्ये उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रिय अभिनेत्री रश्मिकाच्या या चित्रपटाचा दमदार टीझर आणि नुकताच प्रदर्शित झालेला पोस्टर आधीच चर्चेत आहे. आता मेकर्सनी एक मोठी घोषणा करत ‘मायसा’ची पहिली झलक 24 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर ‘मायसा’च्या निर्मात्यांनी रश्मिका मंधानाचं एक प्रभावी पोस्टर शेअर करत फर्स्ट ग्लिम्प्सच्या रिलीज डेटची माहिती दिली. पोस्टसोबत त्यांनी लिहिले
“जखमांतून ताकद. वेदनेतून स्वातंत्र्य. जग #RememberTheName नक्कीच लक्षात ठेवेल 🔥
#MYSAA ची पहिली झलक 24.12.25 रोजी ❤️🔥❤️🔥❤️🔥
@iamRashmika यांना कधीही न पाहिलेल्या अंदाजात पाहण्यासाठी सज्ज व्हा 💥💥💥”
या घोषणेमुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली असून, लवकरच चित्रपटाची एक खास झलक प्रेक्षकांसाठी रिलीज केली जाणार असल्याचेही मेकर्सनी सांगितले आहे. ‘मायसा’ हा यावर्षातील सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. अनफॉर्मुला फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला आणि रविंद्र पुल्ले यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘मायसा’ हा भावनिक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आदिवासी भागाच्या पार्श्वभूमीवर आधारित या कथेत दमदार दृश्ये, सशक्त कथानक आणि रश्मिका मंधानाचा लक्षवेधी अभिनय पाहायला मिळणार आहे.
