Download App

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर 1 कोटींचे बक्षीस… पण ‘ही’ असेल अट

Shashi Tharoor on ‘The Kerala Story’ : गेल्या काही दिवसांपासून निर्माता विपुल अमृतलाल यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपचा प्रोपगेंडा (BJP propaganda) असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन सोशल मिडीयावर काही लोक कौतुक करत आहेत तर काही लोक टीका करत आहेत.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने टीका केली जात आहे. यावर आता काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना शशी थरूर यांनी लिहिले की, ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकते. ही गोष्ट आपल्या केरळची नाही. मात्र, आता शशी थरूर यांनी या चित्रपटाबाबत आणखी एक ट्विट केले आहे. या चित्रपटाबाबत त्यांनी एक आव्हान दिले आहे.

दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमधून दिसून येते की केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना बळजबरीने धर्मांतरित करून ISIS मध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले. या चित्रपटाच्या मुद्द्यावरून वाद वाढत आहे. या वस्तुस्थितीबाबत काँग्रेससह इतर पक्ष या चित्रपटाला विरोध करत असून हा अजेंडा असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

शशी थरूर यांचे ट्विट
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केले की, “केरळमधील 32,000 महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि काही पैसे कमावण्याची संधी आहे.” ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की पुरावे नसल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे?

IPL 2023 : ऑरेंज कॅप विजेत्यांसाठी IPL ट्रॉफी अनलकी, आकडेवारी पाहून वाटेल आश्चर्य

यासोबतच थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘केरळमधील 32000 महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये घेऊन जा’ असे लिहिले आहे. या पोस्टमध्ये शशी थरूर यांनी ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅग दिला आहे. शशी थरूर यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.

Tags

follow us