The most magnificent star cast in Marvel’s history : या वर्षातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 30 कलाकारांच्या दमदार ताफ्यासह 18 डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतीय चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अॅव्हेंजर्स: डूम्सडेचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने एक गोष्ट स्पष्ट केली आहे – मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि भव्य स्टारकास्ट आहे. तब्बल 30 कलाकार या चित्रपटात झळकणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विविध चित्रपटमालिकांमधील लोकप्रिय सुपरहिरो आणि प्रतिष्ठित पात्रांना एकत्र आणत अॅव्हेंजर्स: डूम्सडे हा चित्रपट सुपरहिरो चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठा संगम ठरणार आहे.
या भव्य कलाकारांमध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, ख्रिस इव्हान्स, ख्रिस हेम्सवर्थ, पेड्रो पास्कल, पॉल रुड, अँथनी मॅकी, फ्लॉरेन्स प्यू, व्हॅनेसा किर्बी, एबॉन मॉस-बॅक्रॅक, वायट रसेल, चॅनिंग टॅटम, सिमू लियू, इयान मॅकेलन, टॉम हिडल्स्टन, जेम्स मार्स्डन, पॅट्रिक स्टुअर्ट, जोसेफ क्विन, सेबॅस्टियन स्टॅन, डेव्हिड हार्बर, लेटिशिया राइट, लुईस पुलमन, केल्सी ग्रामर, कॅथरीन न्यूटन, डॅनी रामिरेझ, विन्स्टन ड्यूक, अॅलन कमिंग, हॅना जॉन-कामेन, रेबेका रोमिन, माबेल कॅडेना आणि टेनॉच हुएर्ता मेजिया यांचा समावेश आहे.
लढाईसाठी कोण कोण सज्ज आहे?
स्टीव्ह रॉजर्स आणि थॉर पुन्हा एकत्र
मार्व्हलचे दोन सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहेत. ख्रिस इव्हान्स स्टीव्ह रॉजर्सच्या भूमिकेत दिसणार असून ख्रिस हेम्सवर्थ पुन्हा थॉरची भूमिका साकारणार आहे. या दोघांचे पुनरागमन मूळ अॅव्हेंजर्स काळाच्या आठवणी जाग्या करणारे ठरणार आहे. त्यांच्यासोबत अँथनी मॅकीचा सॅम विल्सन, पॉल रुडचा स्कॉट लँग आणि मृत्यूला वारंवार हरवणारा टॉम हिडल्स्टनचा लोकीही या भव्य संघाचा भाग असणार आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील मार्व्हल नायक एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
Maharashtra Rain Alert : पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
नवी पिढी घेणार जबाबदारी
फ्लॉरेन्स प्यूची येलेना बेलोव्हा, सेबॅस्टियन स्टॅनचा बकी बार्न्स, वायट रसेलचा यू.एस. एजंट, डेव्हिड हार्बरचा रेड गार्डियन, डॅनी रामिरेझचा फाल्कन आणि हॅना जॉन-कामेनची घोस्ट यांच्यासोबत एक नवा आणि प्रचंड शक्तिशाली नायक संघात सामील होणार आहे – लुईस पुलमनचा सेंट्री. त्याच्या अफाट शक्तींमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हे सर्वजण मिळून नव्या *अॅव्हेंजर्स*ची ताकद दाखवणार आहेत.
एक्स-मेन अखेर एमसीयूमध्ये
मार्व्हल चाहत्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. पॅट्रिक स्टुअर्टचा प्रोफेसर एक्स, इयान मॅकेलनचा मॅग्नेटो, जेम्स मार्स्डनचा सायक्लॉप्स, अॅलन कमिंगचा नाईटकॉलर, रेबेका रोमिनची मिस्टिक आणि केल्सी ग्रामरचा बीस्ट हे सर्व फॉक्स युगातील एक्स-मेन पात्रे पुन्हा एकत्र येत एमसीयूमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत. जुन्या एक्स-मेन चित्रपटांचे चाहते असाल तर हा क्षण खास ठरणार आहे.
फॅन्टॅस्टिक फोरचा दमदार सहभाग
पेड्रो पास्कलचा रीड रिचर्ड्स, व्हॅनेसा किर्बीची सू स्टॉर्म, जोसेफ क्विनचा जॉनी स्टॉर्म आणि एबॉन मॉस-बॅक्रॅकचा बेन ग्रिम हे फॅन्टॅस्टिक फोरमधील नायक थेट या महासंग्रामात सहभागी होणार आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच डॉक्टर डूमचे संकट घोंगावत असल्याचे संकेत मिळत आहेत.
वाकांडा पुन्हा सज्ज
बहुविश्वासाठीच्या या महायुद्धात वाकांडाचा सहभाग अपरिहार्य आहे. लेटिशिया राइटची शुरी, विन्स्टन ड्यूकचा एम’बाकू आणि टेनॉच हुएर्ता मेजियाचा नेमोर हे एमसीयूमधील सर्वात शक्तिशाली योद्ध्यांपैकी तीन योद्धे पुन्हा रणांगणात उतरतील.
Narendra Modi : पेपर लीक प्रकरणात ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करणार; PM मोदींची मोठी घोषणा
परिचित चेहरे, नवी ताकद
या भव्य संघात सिमू लियूचा शांग-ची, डेडपूल अँड वुल्व्हरिनमधील संस्मरणीय उपस्थितीनंतर पुन्हा दिसणारा चॅनिंग टॅटमचा गॅम्बिट, कॅथरीन न्यूटनची कॅसी लँग आणि माबेल कॅडेनाची नमोरा यांचाही समावेश आहे. प्रत्येक पात्र या कथेला अधिक व्यापक आणि रोमांचक बनवणार आहे.
आणि मग… डॉक्टर डूम!
सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे रॉबर्ट डाऊनी ज्युनियरचे पुनरागमन. मात्र यावेळी ते आयर्न मॅन टोनी स्टार्कच्या भूमिकेत नाहीत, तर मार्व्हलमधील सर्वात धोकादायक खलनायकांपैकी एक असलेल्या व्हिक्टर व्हॉन डूम अर्थात डॉक्टर डूमच्या भूमिकेत दिसणार आहेत. दशकाहून अधिक काळ एमसीयूची ओळख बनलेले डाऊनी ज्युनियर आता खलनायकाच्या भूमिकेत कसा धमाका करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अॅव्हेंजर्स, एक्स-मेन, फॅन्टॅस्टिक फोर, वाकांडा आणि संपूर्ण बहुविश्व – हे सर्व एका पडद्यावर एकत्र येणार आहेत. अॅव्हेंजर्स: डूम्सडे हा केवळ एक चित्रपट नाही, तर मार्व्हलने आजवर उभारलेल्या विश्वाचा परमोच्च बिंदू आणि भविष्यातील नव्या पर्वाची सुरुवात आहे.
अॅव्हेंजर्स: डूम्सडेचे दिग्दर्शन अँथनी आणि जो रुसो यांनी केले असून केविन फाईगी, लुईस डी’एस्पोसिटो आणि जोनाथन श्वार्ट्झ यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी भारतभरातील चित्रपटगृहांत प्रीमियम स्वरूपात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
