Download App

आणखी एका मोठ्या राज्यात ‘द केरळ स्टोरी’वर बंदी, बदनामीचे षडयंत्र

‘The Kerala Story’ banned in West Bengal : पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द केरळ स्टोरी’ला अनेक राज्यांतून जोरदार विरोध होत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या (The Kerala Story) मुद्द्यावर भाजप आणि सीपीआय (एम) वर जोरदार हल्लाबोल केला आहे. सीएम बॅनर्जी म्हणाले की, त्यांना सांगण्यात आले आहे की बंगाल फाइल्सची तयारी केली जात आहे. हा पश्चिम बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

WTC Final 2023 : के. एल. राहुलच्या जागी ईशान किशनची संघामध्ये वर्णी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “ही केरळ फाईल काय आहे? मी सीपीआयएमला पाठिंबा देत नाही, ते भाजपसोबत काम करत आहेत. माझ्याऐवजी चित्रपटाला विरोध करणे हे त्यांचे कर्तव्य होते. मला केरळच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की तुमचा पक्ष भाजपसोबत काम करत आहे आणि तोच पक्ष केरळ फाईलही दाखवत आहे. आधी काश्मीर आणि नंतर केरळची बदनामी केली जात आहे.

दरम्यान, सर्व वादानंतरही ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच सर्वसामान्यांकडूनही दाद मिळत आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात लांबच लांब रांगा लागत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या वीकेंडला चित्रपटाने 30 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आज म्हणजेच सोमवारीही चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असल्याचे मानले जात आहे.

Tags

follow us