Abhishek Pathak : दृश्यमचे लेखक अडकणार विवाह बंधनात, येथे होणार विवाह सोहळा

मुंबई : बॉलिवूडचे काही चित्रपट आहेत. जे रिलीज झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात फिट बसले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे दृश्यम 2 अजय देवगणचा हा चित्रपट 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे चित्रपट दृश्यमचे लेखक आहेत. सोशल मीडियावर ते खूप चर्चेत होते. आता या लेखकांबद्दल एक बातमी […]

Untitled Design   2023 02 06T183822.649

Untitled Design 2023 02 06T183822.649

मुंबई : बॉलिवूडचे काही चित्रपट आहेत. जे रिलीज झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात फिट बसले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे दृश्यम 2 अजय देवगणचा हा चित्रपट 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला.

अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे चित्रपट दृश्यमचे लेखक आहेत. सोशल मीडियावर ते खूप चर्चेत होते. आता या लेखकांबद्दल एक बातमी समोर आली आहे. या बातमीने अभिषेक पाठक यांचे चाहते खूश झाले आहेत. चला तरा जाणून घेऊ काय आहे ही बातमी ?

दृश्यमचे लेखक अभिषेक पाठक विवाह बंधनात अडकणार आहेत. अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे रोमॅंटिक फोटो समोर आले होते.

त्यानंतर आता ते लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. एका रिपोर्टनुसार अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांचा विवाहसोहळा 8 आणि 9 फेब्रुवारी 2023 ला गोव्यात होणार आहे.

‘दृश्यम 2’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांची 24 जुलै 2022 ला एंगेजमेंट झाली. त्यानंतर त्यांचे नाते अधिकृत झाले. या दोघांच्या अफेअरची बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. त्यानंतर चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. शिवालिका ओबेरॉय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवालिका ओबेरॉयने ‘खुदा हाफिज’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Exit mobile version