‘व्हेलफॉल’चा नवा थरारक ट्रेलर प्रदर्शित; महाकाय व्हेलच्या पोटात अडकलेल्या तरुणाची जगण्यासाठीची धडपड

नव्या ट्रेलरमध्ये ऑस्टिन अब्राम्स साकारत असलेला ‘जे गार्डिनर’ एका महाकाय स्पर्म व्हेलच्या पोटात अडकल्याचे पाहायला मिळते.

Untitled Design   2026 09 11T125611.423

Untitled Design 2026 09 11T125611.423

Thrilling new trailer for ‘Whalefall’ released : ऑस्टिन अब्राम्स आणि जोश ब्रोलिन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हेलफॉल’ या बहुप्रतीक्षित सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 20th Century Studios आणि Imagine Entertainment निर्मित हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. डॅनियल क्रॉस यांच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

नव्या ट्रेलरमध्ये ऑस्टिन अब्राम्स साकारत असलेला ‘जे गार्डिनर’ एका महाकाय स्पर्म व्हेलच्या पोटात अडकल्याचे पाहायला मिळते. अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलेल्या जे समोर व्हेलच्या पोटातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान असते. त्याच्याकडे केवळ एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने प्रत्येक क्षण त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

या चित्रपटाची कथा जे गार्डिनर आणि त्याचे वडील यांच्यातील नात्याभोवतीही फिरते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष शोधण्यासाठी जे कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती किनारपट्टीजवळ समुद्रात डायव्हिंगसाठी जातो. मात्र, समुद्राच्या खोल भागात गेल्यानंतर एका महाकाय स्पर्म व्हेलकडून त्याला गिळले जाते. त्यानंतर सुरू होते त्याची जगण्यासाठीची थरारक लढाई.

पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई

व्हेलच्या पोटात अडकलेल्या जे जवळ केवळ एक तासाचा ऑक्सिजन शिल्लक असतो. अशा परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना त्याला आपल्या वडिलांनी आयुष्यभर दिलेल्या शिकवणींची आठवण होते. वडिलांकडून मिळालेले अनुभव आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धडेच आता त्याचा जीव वाचवण्याची गुरुकिल्ली ठरू शकतात. त्यामुळे जगण्यासाठीचा संघर्ष आणि पिता-पुत्राच्या नात्यातील भावनिक पैलू अशा दोन्ही अंगांनी ‘व्हेलफॉल’ची कथा पुढे सरकते.

ब्रायन डफिल्ड यांनी ‘व्हेलफॉल’चे दिग्दर्शन केले असून ब्रायन डफिल्ड आणि डॅनियल क्रॉस यांनी पटकथा लिहिली आहे. चित्रपटात ऑस्टिन अब्राम्स आणि जोश ब्रोलिन यांच्यासह एलिझाबेथ शू, जॉन ऑर्टिझ, जेन लेव्ही आणि एमिली रुड यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ब्रायन ग्रेझर, ब्रायन डफिल्ड, जेब ब्रॉडी आणि अॅलन मँडेलबॉम यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर डग मेरिफिल्ड, रिचर्ड अबेट आणि विल रोबोथम हे कार्यकारी निर्माते आहेत.

खंडणीसाठी माझ्या भाऊ-पुतण्याला मारहाण, मंत्री अतुल सावे यांचा गंभीर आरोप, कठोर कारवाईची मागणी

महाकाय व्हेलच्या पोटात अडकलेला तरुण, हाताशी असलेला केवळ एक तासाचा ऑक्सिजन आणि जीव वाचवण्यासाठी वडिलांनी दिलेल्या शिकवणींचा आधार अशा थरारक आणि भावनिक कथानकामुळे ‘व्हेलफॉल’कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 20th Century Studios आणि Imagine Entertainmentचा हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version