Download App

Tiger 3 : एजंट झोयाच्या रूपात परतली कॅटरिना, टायगर 3 चे आणखी एक पोस्टर रिलीज

Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील नायिका कॅटरिना कैफ हीचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

एजंट झोयाच्या रूपात पुन्हा परतली कॅटरिना…

चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये म्हणजे टायगर आणि टायगर जिंदा है मध्ये कॅटरिनाने एजंट झोया ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा टायगर 3 मध्ये देखील कॅटरिना एजंट झोयाच्या रूपात पुन्हा परतली आहे. तिच्या याच लूकचे पोस्टर आता रिलीज करण्यात आले आहेत. यावेळी देखील कॅटरिना तिच्या फिट आणि बिन्धास्त अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Sanskruti Balgude : काळी पैठणीतील संस्कृतीचा मोहक अंदाज पडतोय फॅन्सना भारी!

गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर 3’च्या (Tiger 3) टीझरविषयी जोरदार चर्चा रंगत होती. नुकतंच यश चोप्रा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यश राज फिल्म्सनी त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा सिनेमा ‘टायगर 3’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत ‘भाईजानचा एक मेसेज’ आपल्याला बघायला मिळाला आणि त्यासोबतच भाईजानचा एक हटका अंदाज देखील बघायला मिळाला आहे. ‘टायगर 3’ या सिनेमाच्या प्रोमोला भाईजानच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. तेव्हापासून या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत होते.

Israel Palestine Conflict : तीव्र संघर्षाची सुन्न करणारी कहाणी…

नुकतंच ‘यश राज फिल्म्स’नी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘टायगर 3’चं एक नवं पोस्टर शेयर करत सिनेमाच्या ट्रेलरची देट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये भाईजानच्या हातात बंदूक घेऊन सावधपणे उभा असलेल्या लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषौ बनला आहे. या पोस्टमध्ये सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाची डेट देखील जाहीर करण्यात आली. येत्या 16 ऑक्टोबर दिवशी ‘टायगर 3’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भाईजानचे चाहते यांनी आत्तापासूनच काऊंटडाउन सुरू केलं आहे.

https://youtu.be/PCA55ahwZh8?si=qfdaIyjis5dKCyjU

Tags

follow us