Download App

Tiger Nageswara Rao: रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’ सिनेमाचे तब्बल 65….

Tiger Nageswara Rao: तेलुगू सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘टायगर नागेश्वर राव’चे (Tiger Nageswara Rao) पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. (Social media) या सिनेमात जबरदस्त अॅक्शन ड्रामा चाहत्यांना बघायला मिळणार आहे. परंतु या सिनेमाचे तब्बल 65 पेक्षा जास्त स्क्रीन्स लागणार आहेत.

या सिनेमात बॉलिवूड स्टार्स देखील दिसणार आहेत. या सिनेमात नुपूर सेनन मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. टायगर नागेश्वर राव हा सिनेमा एका प्रसिद्ध चोराचा बायोपिक आहे. या सिनेमामध्ये रवी तेजाची वेगळी व्यक्तिरेखा बघायला मिळणार आहे. सिनेमातील त्याची देहबोली, बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत सर्व काही वेगळे असणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=PCA55ahwZh8

सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यावर लोकांची सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सिनेमाच्या टीझरला जॉन अब्राहमने आपला आवाज देण्यात आला आहे. जॉन अब्राहमचा दमदार आवाज या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ऐकायला मिळणार आहे. रवी तेजा व्यतिरिक्त प्रवीण दाचाराम, रेणू देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

Sam Bahadur Teaser: सॅम बहादुर सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज

हा सिनेमा 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात 5 सुपरस्टार, तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्ती आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे एकत्र येत आहेत. रवी तेजा टायगर नागेश्वर रावची भूमिका साकारणार आहे.

Tags

follow us