Download App

मराठी चित्रपटात मलायकाचा जलवा, ‘येक नंबर’ च्या टायटल साँगमधून चाहत्यांना करणार घायाळ

Malaika Arora : काही दिवसापूर्वी 'येक नंबर' चा (Yek Number) ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. सोशल मीडियावर (Social Media) या ट्रेलरची

  • Written By: Last Updated:

Malaika Arora : काही दिवसापूर्वी ‘येक नंबर’ चा (Yek Number) ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. सोशल मीडियावर (Social Media) या ट्रेलरची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून असा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील भन्नाट टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

एनर्जीने भरलेल्या या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकर यांचे आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला (Bollywood) भुरळ घालणारी मलायका अरोरा (Malaika Arora) या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) त्यामुळे ट्रेलरप्रमाणे या गाण्याची देखील जबरदस्त क्रेझ पाहायला मिळणार आहे. हे आयटम साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. तर दुसरीकडे या सॉंगमध्ये सिद्धार्थ एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. तसेच पहिल्यांदा मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

या गाण्याबद्दल अजय गोगावले म्हणतात, “पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. मात्र गेल्या काही महिन्यापासून आयटम साँग कमी झाले पण आम्हाला पुन्हा एकदा येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली आहे. तसेच या चित्रपटात आयटम साँग विनाकारण दाखल करण्यात आलेला नाही.

स्टोरीच्या गरजेनुसार या चित्रपटामध्ये आयटम साँग ठेवण्यात आला आहे. आम्हाला या आयटम साँगमध्ये काहीतरी वेगळे करायचे होते त्यामुळे आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणे करण्याचा प्रयत्न केला आहे असं अजय गोगावले म्हणाले.

देणार म्हणजे देणार हा अजितदादांचा वादा, लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 3 हजार

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते असून झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

follow us