Download App

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला आज ५४ वर्ष पूर्ण

  • Written By: Last Updated:

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आज त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला ५४ वर्ष झाली आहेत. ‘सात हिंदुस्तानी’ (Sath Hindustani) या चित्रपटातून अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

करिअरच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना त्यांच्या उंची आणि आवाजामुळे कित्येक निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. कुणी त्यांना उंट म्हटलं तर कुणी पाहताक्षणीच त्यांना हाकलून दिलं. मात्र, त्यांनी हार मानली नाही आणि 1969 साली सात हिंदुस्थानी या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बींनी आज एक पोस्टर शेअर केलं. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिलेलं आहे की, 15 फेब्रुवारी 1069 साली मी माझा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी साईन केला आणि 7 नोव्हेंबर 1969 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

ख्वाजा अहमद अब्बास यांनी सात हिंदुस्थानी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. सात भारतीयांच्या साहसाची ही कथा होती. ज्यांनी गोव्यातील पोर्तुगीज शासनाला नष्ट करण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटाला त्या काळी अनेक पुरस्कार मिळाले होते. अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामधून बॉलीवूला त्यांचा महानायक मिळाला.

आव्हाड समर्थकांनी सहाय्यक आयुक्ताला चोपलं, ‘त्या’ कथित क्लिपमध्ये धमकावल्याचा आरोप 

कोट्यवधी रूपयांची कमाई करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी फक्त पाच हजार रूपये मानधन घेतले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर बिग बीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे त्यांचे सर्वच चित्रपट हे त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी यांचे चित्रण झाले. सध्या ते एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन आकारतात.

 

Tags

follow us