Narnia: The Magician’s Nephew : प्रसिद्ध दिग्दर्शिका ग्रेटा गर्विग यांच्या आगामी बहुप्रतीक्षित ‘Narnia: The Magician’s Nephew’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. C. S. Lewis यांच्या गाजलेल्या ‘The Chronicles of Narnia’ या फँटसी मालिकेतील कथेवर आधारित या चित्रपटातून प्रेक्षकांना नॉर्नियाच्या जादुई विश्वाची नवी आणि रोमांचक सफर अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट भारतात 12 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये नॉर्नियाच्या उत्पत्तीची कथा आणि या अद्भुत जगाची निर्मिती कशी झाली, याची झलक पाहायला मिळते. डेव्हिड मॅकेन्ना हा तरुण डिगरी किर्कच्या भूमिकेत, तर बीट्रिस कॅम्पबेल पॉली प्लमरच्या भूमिकेत दिसणार आहे. डिगरी आणि पॉली यांचा प्रवास त्यांना एका रहस्यमय आणि जादुई जगात घेऊन जातो.
या चित्रपटात Emma Mackey तरुण Jadis अर्थात पुढे White Witch म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे. तर Daniel Craig हा Uncle Andrewची भूमिका साकारत आहे. याशिवाय Carey Mulligan, Kobna Holdbrook-Smith आणि Meryl Streep यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘Barbie’सारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या Greta Gerwig यांनी C. S. Lewis यांच्या या लोकप्रिय फँटसी विश्वाला आपली नवी दृष्टी दिली आहे. यापूर्वी Netflix आणि Sony Pictures यांनी चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित केली होती. त्यात Jadis, Digory आणि Polly यांची झलक पाहायला मिळाली होती. आता नव्या ट्रेलरमुळे या जादुई विश्वातील व्यक्तिरेखा आणि कथानकाची अधिक स्पष्ट झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
‘The Magician’s Nephew’ हे C. S. Lewis यांच्या ‘The Chronicles of Narnia’ मालिकेतील प्रकाशन क्रमाने सहावे पुस्तक आहे. मात्र कथानकाच्या कालक्रमानुसार ही कथा ‘The Lion, the Witch and the Wardrobe’च्या आधी घडते. नॉर्नियाच्या निर्मितीची कहाणी आणि या जादुई जगाच्या सुरुवातीच्या घटनांवर या चित्रपटाचा भर आहे.
Netflix निर्मित आणि Sony Pictures Releasing International कडून वितरित करण्यात येणारा ‘Narnia: The Magician’s Nephew’ हा चित्रपट 12 फेब्रुवारी 2027 रोजी भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नॉर्नियाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
