शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे.

Untitled Design   2026 10 02T133042.315

Untitled Design 2026 10 02T133042.315

Trailer of the movie “Sahal” launched : शाळेची सहल म्हणजे धमालमस्ती आणि गमतीजमती… शाळेच्या सहलीशी संबंधित एक मनोरंजक कथा सहल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, 9 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर असून, सहनिर्माते मुकुंद वसंत खुपेरकर आहेत. मूळ पटकथा मुकुंद वसंत खुपेरकर यांनी लिहिली आहे.

‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील, रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर याचे या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य नायक म्हणून पदार्पण असून त्याने याआधी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका “तुझ्यात जीव रंगला” ह्यामध्ये लहान राणाच्या भावाची म्हणजेच सुरजची भुमिका साकारली होती, तसेच डॉ केशव हेगडेवार ह्यांची बाल भुमिका ही साकारली होती.चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यानी केले असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे.

वनडे विश्वचषक 2027 चा नवा फॉरमॅट जाहीर, सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे वाढणार थरार

सुहास मुंढे, समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याच्या आवाजात चित्रपटातील गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे. मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता, श्रेया चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन, तर प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शन केले आहे. एका शाळेतील मुलांची गणपतीपुळे येथे सहल जाणार असते. या सहलीला जाण्यासाठी पैसे द्यावे लागणार असतात. मात्र, या शाळेतील मुलांमध्ये असणारे अंतर्गत संघर्ष, विशेषतः मुलींवरून असणारे वादविवाद, सहलीसाठी पैसे देण्यास पालकांचा विरोध अशा कथासूत्रावर “सहल” हा चित्रपट बेतला आहे.

आज पालक असलेल्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारी ही गोष्ट आहे. एका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये त्याचे पालक, शिक्षक आणि अर्थात संभोवतालचे वातावरण यागोष्टी महत्वपूर्ण असतात. शाळेत असतानाच निरागसपणा, समज-गैरसमज, त्या वयातला उत्साह, मुलीनं बाबतचे आकर्षण हे सगळंच या गोष्टीतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. उत्तम कथानकाला दमदार अभिनयाची जोड आहे. त्यामुळे या सहलीचा अनुभव लक्षात राहणारा ठरेल. त्यासाठी आता ९ ऑक्टोबरपर्यंतच वाट पहावी लागणार आहे.

Exit mobile version