रंगभवनची जागा दादासाहेब फाळके चित्रनगरीला हस्तांतरित करा, महामंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधवांची मागणी

Sudhir Mungantiwar : मुंबईच्या धोबीतलाव येथील रंगभवन ही जुनी वास्तू मागील अनेक वर्षापासून बंदस्थितीत आहे. तसेच आजूबाजूचा परिसर देखील अस्वच्छ

Sudhir Mungantiwar : रंगभवनची जागा दादासाहेब फाळके चित्रनगरीला हस्तांतरित करा, महामंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधवांची मागणी

Sudhir Mungantiwar : रंगभवनची जागा दादासाहेब फाळके चित्रनगरीला हस्तांतरित करा, महामंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधवांची मागणी

Sudhir Mungantiwar : मुंबईच्या धोबीतलाव येथील रंगभवन ही जुनी वास्तू मागील अनेक वर्षापासून बंदस्थितीत आहे. तसेच आजूबाजूचा परिसर देखील अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे ही संपूर्ण जागा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळास तात्काळ हस्तांतरित  करावी अशी मागणी महामंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सध्या शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अखत्यारीत ही जागा आहे. ऐकेकाळी दिग्गजांच्या पदस्पर्शाने व अभिनयाने पावन झालेले येथील रंगभवन गेले अनेक वर्ष धूळखात आहे.

ते पून्हा सुरळीत सुरु व्हावे अशी भावना अनेक रंगकर्मीची आहे. त्यामुळे या जागेचा  पुनर्विकास करून येथे अत्याधुनिक सोई-सुविधा युक्त चित्र-नाट्यगृह , चित्रपट संग्रहालय, बहुउद्देशीय सभागृह, कलाकारांसाठी विश्रामगृह, सुसज्ज ई-ग्रंथालय, कलादालन, सुसज्ज यांत्रिकी वाहनतळ, उपहारगृह, तालीम हॉल आदि वास्तू उभारून हा प्रकल्प लोकाभिमुख आणि लोकोपयोगी करता येईल अशी संकल्पना जाधव यांनी मांडली आहे.

कृष्णा श्रॉफने ‘पॅनल डिस्कशन’ मध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली, माझी फॅमिली…

यासाठीच नफ्यात कार्यरत असलेल्या आणि चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणे असे उद्देष्ट असलेल्या गोरेगाव चित्रनगरीकडे ही जागा वर्ग केल्यास जागेचा पुनर्विकास करणे सुलभ होईल असे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तात्काळ याविषयाबाबत सांस्कृतिक कार्य विभागास शासननिर्णय निर्गमित करण्याबाबत आदेश द्यावेत अशी विनंती जाधव यांनी पत्राद्वारे सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली आहे.

Exit mobile version