शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’ मधील पहिले गाणे ‘तू मिल जाए’ प्रदर्शित; अरिजित आणि एड शीरनच्या आवाजाची जादू

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे वाढदिवसाचे सरप्राइज दुसरे काय असू शकते. शाहरुखने आपल्या आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे वाढदिवसाचे सरप्राइज दुसरे काय असू शकते. शाहरुखने आपल्या आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘किंग’ मधील ‘तू मिल जाए’ या पहिल्या गाण्याचा पडदा अखेर उघडला आहे. या गाण्यासाठी संगीत आणि सिनेमाच्या जगातील काही रोमांचक नावे एकत्र आली आहेत. या गाण्यात जागतिक स्तरावरील संगीत सहकार्य पाहायला मिळत असून, अरिजित सिंह यांचा सुरेल आवाज आणि एड शीरनची अनोखी रॅप शैली यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. यासोबतच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडत्या ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक पुन्हा एकदा या गाण्यात पाहायला मिळत आहे.

या म्युझिक व्हिडिओमधून ‘किंग’च्या विश्वाची झलक पाहायला मिळते. व्हिडिओची सुरुवात शाहरुख खान यांच्या दमदार संवादाने होते, “मैं कातिल नहीं आशिक हूं और निशान मेरा माशूका, और वह आशिक ही क्या जो दिल चीर ना दे.” या संवादातून त्यांच्या व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि चित्रपटाचा मूड लगेचच स्पष्ट होतो. त्यानंतर ऐकायला मिळते एक उत्साही आणि रोमँटिक डान्स ट्रॅक, ज्यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंह आणि जागतिक पॉप सेन्सेशन एड शीरन एकत्र आले आहेत. दोन वेगवेगळ्या संगीतविश्वांना जोडणारा हा एक खास म्युझिकल कोलॅबोरेशन आहे. याशिवाय, मधुबंती बागची यांच्या सुरेल आवाजाने या गाण्याला आणखी खास बनवले आहे.

रोमान्स, अ‍ॅक्शन आणि थरार यांचा अनोखा संगम असलेले हे गाणे ‘किंग’ची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणते. केवळ संगीतापुरते मर्यादित न राहता, हे गाणे चित्रपटातील विविध पैलूंची झलकही दाखवते. ‘तू मिल जाए’ या गाण्यात अनेक प्रतिभावान कलाकार एकत्र आले आहेत. सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले असून, कुमार यांनी गीतलेखन केले आहे. पीयूष-शाजिया यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर एड शीरनने यातील इंग्रजी रॅप लिहिला आहे. म्युझिक व्हिडिओचा शेवट शाहरुख खान यांच्या एका दमदार संवादाने होतो, “इस बार दिल में आग लगी है, अब दुनिया जलाए बिना मानेगा नहीं.” या संवादातून पुन्हा एकदा ‘किंग’च्या व्यक्तिमत्त्वातील रुबाब, तीव्रता आणि प्रभावी अंदाज अधोरेखित होतो.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. आता ‘तू मिल जाए’ या गाण्यातून या दोघांची तीच रोमँटिक केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. गाण्यातील रोमँटिक क्षणांसोबतच अप्रतिम दृश्येही लक्ष वेधून घेतात. अ‍ॅक्शन सीन्स, आकर्षक ट्रान्झिशन्स आणि दमदार संवाद यांमुळे हे गाणे केवळ एक म्युझिक व्हिडिओ न राहता त्यापेक्षा अधिक खास ठरते. त्याचबरोबर, प्रेक्षकांना ‘किंग’च्या भव्य विश्वाची झलकही पाहायला मिळते. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मारफ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे.

हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका-

‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तू मिल जाए’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. तसेच, या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ झी म्युझिक कंपनी आणि टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

Exit mobile version