Download App

Tunisha Sharma Suicide case : ‘मी मुस्लिम असल्याने अटक केली’, शीजान खानचा दावा

मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात (Tunisha Sharma Suicide case) अटक करण्यात आलेला आरोपी शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. आरोपी शीजान खानने 23 जानेवारी रोजी जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी आरोपी शीजान खाननेही (Sheezan Khan) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे.

यापूर्वी 13 जानेवारीला शीजान खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर शीजान खानच्या वकिलाने अभिनेत्याच्या बचावासाठी अनेक युक्तिवाद केले होते. शीजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या वतीने आता अभिनेत्याला मुस्लिम असल्याने अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शीजनचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी पालघर कोर्टात तुनिषा शर्मावर अनेक गंभीर आरोप केले आहे. अभिनेत्याला गोवण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी खुलासा सादर केला होता.

तुनिषा शर्माच्या वकिलाच्या युक्तिवादाच्या आधारे पालघर न्यायालयाने शीजनचा जामीन अर्ज फेटाळला. तुनिषाच्या वकिलाने सांगितले होते की, अभिनेता शीजान हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो दिवंगत अभिनेत्री तुनिषाचा प्रियकर होता. तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो किंवा पुरावे नष्ट करू शकतो. अशा स्थितीत शीजनलाच कोठडीत ठेवले पाहिजे.

शीझानच्या वकिलाने अभिनेत्याचा बचाव करताना सांगितले की, “शीझानला केवळ माझ्या धर्मामुळे अटक करण्यात आली आहे. लोक या प्रकरणाकडे ‘लव्ह जिहादच्या’ दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली असती तर सत्य समोर आले असते. मला अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हते. मी मुस्लिम नसतो तर हे घडले नसते, असा दावा करण्यात आला आहे.

Tags

follow us