Deepjyoti : दर आठवड्याला आपल्या आवडत्या मालिकांमध्ये काय नवीन घडणार, कोणतं नातं काय वळण घेणार आणि कोणते नवे खुलासे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. या आठवड्यातही ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या मालिकांमध्ये मोठे खुलासे पाहायला मिळणार आहेत. कुठे प्रेम व्यक्त करण्यासाठी तयारी होत असताना दिसणार आहे, कुठे आई-मुलीच्या नात्यातील संघर्षाला नवं रूप मिळणार आहे, तर कुठे एका मोठ्या कटाचा मास्टरमाइंड समोर येणार आहे. त्यामुळे या तिन्ही मालिकांमध्ये येणारी ही नवी वळणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहेत.
‘दीपज्योती’ मध्ये गौरी घरी परतल्यानंतर ज्योतीने पुरुषोत्तम आणि आत्या यांच्यातील वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, दीपवर ज्योतीची नजर अधिकच राहू लागल्याने तिला आपल्याबद्दल काहीतरी संशय येत असल्याचं दीपला जाणवतं. तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दीपने खोटी गर्लफ्रेंड आणण्याचा प्लॅन आखलाय. मात्र त्याच्या मित्रांनी केलेल्या गोंधळामुळे एकीऐवजी चक्क चार मुली दीपच्या आयुष्यात आल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे ज्योती आणि आत्या दीपचं चार वेगवेगळ्या मुलींशी काहीतरी सुरू असल्याचा गैरसमज करून घेतात. मात्र दीपच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. आपल्या मित्रांसमोर तो ज्योतीवरील प्रेमाची कबुली देतो. मित्रांच्या अपयशी प्रेमकहाण्या ऐकल्यानंतर ज्योतीकडून नकार मिळण्याची किंवा तिच्या हातचा मार खाण्याची भीती त्याला वाटते. मात्र ज्योतीनेच त्याला थेट, ‘तुला कुणी आवडतंय का?’ असा प्रश्न विचारल्यानंतर दीप धाडस करण्याचा निर्णय घेतो. आता दीप ज्योतीला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी चक्क ग्रँड प्रपोजलची तयारी करणार आहे. आता हे खास प्रपोजल नक्की काय असणार ? त्यांच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
‘कमळी’ च्या आयुष्यातील संघर्ष आता एका नव्या टप्प्यावर पोहोचणार आहे. आतापर्यंत अनेकगोष्टी मनात ठेवून परिस्थितीचा सामना करणारी सरोज आता मात्र गप्प बसणार नाही. आपल्या मुलीच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दल तिला सगळं आठवतंय आणि आता आपल्या मुलीला तिचं हक्काचं स्थान मिळवून देण्याचा निर्धार ती करते. याच पार्श्वभूमीवर सरोज आणि कामिनी यांच्यात थेट आमना-सामना होणार आहे. सरोजच्या ठाम भूमिकेमुळे दोघींमधील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. या सगळ्यात कमळीच्या लूकही बदलणार आहे. कमळीचा हा नवा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाची नांदी ठरणार का, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणार आहे. एकीकडे सरोज आपल्या मुलीसाठी ठामपणे उभी राहणार आहे, तर दुसरीकडे कामिनीसमोरही नवं आव्हान उभं राहणार आहे. सरोजच्या या आक्रमक भूमिकेनंतर कामिनी काय उत्तर देणार? कमळीला तिचं हक्काचं स्थान मिळणार का? आणि कमळीचा बदललेला लूक तिच्या आयुष्यातील कोणत्या नव्या पर्वाची सुरुवात करणार?
‘तारिणी’ मध्ये मागील आठवड्यात पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर खांडेकर कुटुंबात श्राद्धाचा प्रसंग पाहायला मिळाला. दरम्यान, JJ ला संपवण्यासाठी आखण्यात आलेला टीम तारिणीचा डाव यशस्वी होतो. JJ ला मिळालेला अनोळखी फोन हा टीम तारिणीने आखलेला सापळा असल्याचं तिच्या लक्षात येतं. या घटनेनंतर युवराजला एक महत्त्वाचा फोन येतो आणि तो या रहस्यमय मास्टरमाइंडला भेटण्याचा निर्णय घेतो.आता याच भेटीत ‘तारिणी’च्या कथानकाला मोठं वळण मिळणार आहे. या सगळ्यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी तो मास्टरमाइंडला भेटण्याचा निर्णय घेतो.युवराज अखेर त्या मास्टरमाइंडला भेटतो आणि त्याच्यासमोर येणारा चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत पडद्यामागून सूत्रं हलवणारा मास्टरमाइंड त्याला पाहून युवराजला मोठा धक्का बसणार आहे. या संपूर्ण कटामागचं काय कारण आहे? त्याचा नेमका उद्देश काय आहे? आणि या खुलाशानंतर युवराज पुढे काय पाऊल उचलणार? टीम तारिणीला या कटाची माहिती मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येत्या भागांमध्ये उलगडणार आहेत. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या आवडत्या मालिका ‘दीपज्योती’, ‘कमळी’, ‘तारिणी’ सदैव तुमच्या झी मराठीवर.
भाजपला ‘ज्ञानेश-जी’ नाही, भगवान गणेश मदत करत आहेत; संबित पात्र काँग्रेसवर भडकले-
