Sara Ali Khan: चर्चा तर होणारच! स्विमिंग पूलमधील हॉट फोटो शेअर केल्याने चर्चेत आली अभिनेत्री

Sara Ali Khan Post Viral: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) जेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलं तेव्हापासून नेहमी ती चर्चेत राहिली आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. कमी वयातच साराने स्वतःचा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T104851.114

Sara Ali Khan

Sara Ali Khan Post Viral: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) जेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलं तेव्हापासून नेहमी ती चर्चेत राहिली आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. कमी वयातच साराने स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे.


गेल्या काही दिवसापासून सारा अली खान क्रिकेटर शुबमन गिलला (Cricketer Shubman Gill) डेट करत असल्याची माहिती मुलाला आहे. अशातच आज साराने एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, आणि साराबरोबर स्विमिंग पूलमध्ये असलेला हा मिस्ट्री मॅन कोण आहे? यांची सध्या चर्चा सुरु झाली आहे. सारा अली खानने तिच्या सुट्टीचे फोटो इंस्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिची आई अमृता सिंग दिसून येत आहे.तसेच सारा या फोटोंमध्ये सुट्टी एंजॉय करत असलयाचे दिसत आहे. यातच स्विमिंग पूलमध्ये तिच्यासह एक व्यक्ती दिसत आहे. तो मिस्ट्री मॅन कोण आहे? त्या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. साराबरोबर असलेला हा मुलगा नेमका कोण आहे? याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. साराचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

या फोटोत असलेल्या मुलाने चष्मा लावला आहे. तो साराबरोबर स्विमिंग पूलमध्ये उतरला आहे आणि दोघंही हसत गप्पा मारत आहेत असा हा फोटो दिसून येत आहे. ही व्यक्ती कोण आहे? याविषयी चाहत्यांनी तिला सवाल देखील केला आहे. सिम्मी नावाच्या अकाऊंटवरून साराला थेट सवाल विचारण्यात आला आहे की, तू कुठल्या क्रिकेटरला नेमकं डेट करते आहेस का? तर सारा तू शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाचव्या फोटोत कोण आहे? असे अनेक सवाल चाहते तिला विचारला आहे.

Exit mobile version