Download App

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

Upcoming Marathi Movie : महाराष्टाच्या मातीतील एक अस्सल रांगडा खेळ म्हणून बैलगाडा शर्यत या खेळाकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील लोक आणि बैल जोड्या यांचा थाट काही आगळाच असतो. या बैलांचा आहार हा शाही आहारापेक्षा कमी नसतो. तर या बैल मालकांची हौस ही काही ओरच असते.

मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतींमध्ये बैलजोड्यांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्यााचा आरोप करत प्राणीमित्र संघटनांनी बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता या बैलगाडा शर्यतींवरील बंद उठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत.

Nana Patole: ‘भाजपा सरकारकडून राज्याची होत असलेली अधोगती…’, नाना पटोलेंचं आवाहन

याच महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ. बैलगाडा शर्यतीवर लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी खिल्लार या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. यामधे ललित प्रभाकर आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. त्यामुळे आता पडद्यावर रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा उडणार आहे.

Tags

follow us