Download App

Jau Bai Gavat: करणार तेव्हा कळणार! ‘जाऊ बाई गावात’ 6 स्पर्धकांची नाव जाहीर

  • Written By: Last Updated:

JauBai Gavat Promo Released: ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavat) ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. (Jau Bai Gavat Promo Released) ज्यामध्ये ‘हार्दिक जोशीने’ (Hardik Joshi) अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे, ती राणी लिहू शकेल का? ती गावात स्वतःची एक अनोखी कहाणी?

कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘Sangeet Devbabhali’ हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार LetsUpp Marathi

सहावी स्पर्धक ‘मोनिशा आजगावकर’, फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची आहे हिला आवड. आपल्या कॅमेरामध्ये दुनियेला जी करते कैद करत असते. शहरातल्या सवयी गावात कश्या टिकणार? तर पहिले चार स्पर्धक आहेत. श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात नाव आहे. तिचे ‘स्नेहा भोसले’ जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा सगळीकडे बोलबाला आहे.

दुसरी स्पर्धक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’ जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा ‘रसिका ढोबळे’ जिच्या फॅशन फिगरवर आहेत सर्व फिदा. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल ‘हेतल पाखरे’ जिचं व्यक्तिमत्व आहे वजनदार. स्वताच्याच प्रेमात असलेल्या ह्या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का?

भाऊ कदम अभिनयातून घेणार ब्रेक! कॉमेडीवीरच्या ‘त्या’ फोटोवरून चर्चांना उधाण

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) या नव्या कार्यक्रमात झळकणार आहे.

‘आता करणार तेव्हा कळणार’. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक. चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीला येणार आहे. 4 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त मराठीवर बघायला मिळणार आहे.

Tags

follow us