नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या मदतीला धावली उर्फी जावेद

मुंबई : गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करताना आलियाने असाही आरोप केला आहे की, ‘तिला मध्यरात्री मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले.’ आता आलियाच्या या व्हिडिओवर टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रतिक्रिया […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

मुंबई : गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करताना आलियाने असाही आरोप केला आहे की, ‘तिला मध्यरात्री मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले.’

आता आलियाच्या या व्हिडिओवर टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रतिक्रिया आली आहे. आलियाचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना, तिने सांगितले की या व्हिडिओने मी दु:खी आहे आणि मला माझ्या दिवसांची आठवण करून दिली.

कोकणानं शिवसेनेला निष्ठावंत दिले अन् त्यात काही बांडगूळ… सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

आलियाचा व्हिडीओ शेअर करत उर्फीने लिहिले की, “मला काही बोलायचे नाही. मी दु:खी आहे. हा व्हिडिओ माझ्या दिवसांची आठवण करून देतो. माझी सहानुभूती आहे.” उर्फी जावेदने स्वतः एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे बालपण खूप कठीण होते. तिचे वडील तिला तसेच आई व भावंडांना शिवीगाळ व मारहाण करायचे. उर्फीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले होते.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचे आरोप काय आहेत?
नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या दोन मुलांसह रात्री घराबाहेर पडताना दिसत होती. मध्यरात्री मुलांना सोबत घेऊन घरातून हाकलून दिल्याचा आरोप तिने केला होता. त्याच्यांकडे फक्त 81 रुपये आहेत. मात्र, नंतर नवाजुद्दीनच्या जवळच्या मित्रांनी हा आरोप फेटाळून लावला होता. याआधी आलियाने नवाज आणि तिच्या सासरच्या मंडळींवरही घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणावरून दोघेही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याचबरोबर हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे.

Exit mobile version