Uorfi Javed: उर्फी जावेदची चाहत्यांकडे भलतीच मागणी; म्हणाली, ‘आधी पैसे द्या मग मी तुम्हाला..’

Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’फेम उर्फी जावेद ही सततच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.   View this post on Instagram […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T114617.281

Uorfi Javed

Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’फेम उर्फी जावेद ही सततच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.


उर्फी ही तिच्या हटके स्टाइलमुळे अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही सतत चर्चेत आहे. तिच्या अतरंगी फॅशनमुळे ती अनेकदा मोठ्या वादात देखील सापडली आहे. उर्फीचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांकडे उर्फीने एक भलतीच मागणी केली आहे.

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली आहे. उर्फी जावेदला विमानतळावर काही चाहत्यांनी घेरले आणि तिच्याकडे सेल्फीची मागणी केली होती. या वेळी तिने पिवळ्या रंगाचा वनपीस घातला होता. मात्र, चाहत्यांचा गराडा बघून उर्फी मोठी अस्वस्थ झाली असल्याचे दिसून आली.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

‘पैसे कोणीही देत ​​नाही, फक्त सेल्फी घेण्यासाठी येत असतात, असे म्हणत तिने चाहत्यांकडे पैशांची मागणी केली आहे. उर्फीच्या या व्हिडीओवरून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘ही सामान्य कपड्यामध्ये चांगली दिसते, मग उलटेसुलटे कपडे का घालते?’ असा सवाल तिला एका यूजरने विचारला आहे. तर ‘ही अजून देखील भीक मागत आहे,’ म्हणत एका चाहत्याने उर्फीला जोरदार ट्रोल केले आहे.

उर्फी जावेदने नुकतीच एका कार्यक्रमात बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानची भेट घेतली होती. दोघींच्या भेटीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून देखील उर्फीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. अनेक चाहत्यांनी त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

Exit mobile version