Uorfi Javed: उर्फी जावेदचा नवा अवतार! अंगावर चिकटवले केस, व्हिडीओ व्हायरल…

Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत असते. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T143827.456

Uorfi Javed

Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत असते.


परंतु आता उर्फी जावेदचा परत नवा कारनामा समोर आला आहे. (Urfi Javed Video) परंतु यावेळी उर्फीचा नवा कारनामा पाहून तुम्ही तोंडातच बोटं घालणार आहात. (Social media) उर्फीने आता तिच्या नव्या व्हिडिओमध्ये असे काही केले आहे की, ज्याचा कोणीही विचार देखील करू शकणार नाही. अंगावर केस चिकटवून अभिनेत्रीने आपली नवी प्रतिभाशैली सादर केली आहे.

उर्फी जावेदने अंगावर केस लावून एक आर्ट तयार केले आहे. जे बघितल्यानंतर सर्वजणच थक्क झाले आहेत. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा अत्यंत बोल्ड अंदाजात दिसत आहे. उर्फीने अशी अनोखी शैली याअगोदर अनेकवेळा केली आहे. परंतु असा अंदाज कधीही दाखवली नाही. तिचा आत्मविश्वास बघून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. मात्र, काही चाहत्यांनी उर्फीची फॅशन बघून चक्कर आली असल्याचे कॉमेंट्स मध्ये ह्यावेळी सांगितले आहे.


काही यूजर्सनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले आहे. कोणी तिची चेष्टा करत आहे, तर कोणी तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे, उपचार करण्याचा सल्ला देत आहे. उर्फी जावेद आता खूप प्रसिद्ध झाली आहे. करीना कपूरनेही तिच्या शोमध्ये तिच्या फॅशनचा उल्लेख करत असते. उर्फी मोठ्या डिझायनर्सच्या शोमध्ये दिसते. तसेच, ती अनेक सेलिब्रिटी डिझायनरच्या आउटफिट्समध्ये देखील दिसत आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

गेल्या अनेक वर्षांपासून उर्फी जावेद आपली फॅशन सर्वांसमोर मांडत असते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये बघितले आहे. उर्फी जावेद ही अगदी कमी कालावधीमध्ये तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक खास ओळख आहे. उर्फी ही कधी काय घालेल याचा काय नेम नाही. ती सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून वादात सापडते. काही लोक तिला ट्रोल करतात, पण असे बरेच लोक आहेत, जे उर्फी जावेदचे कौतुक देखील करत असतात.

Exit mobile version