Veeza Veera second song from Dhanush-Mammootty starrer Om Chapter 1 released for audience : स्पीकर्सचा आवाज वाढवा, कारण ‘वीझा वीरा’च्या तालावर आता म्युझिकचा तुफान धुमाकूळ घालणार आहे! धनुष आणि ममूटीच्या आगामी ‘ओम: चैप्टर 1: उधिरम – द ब्लड वुड’ या चित्रपटातील दुसरं गाणं ‘वीझा वीरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. म्युझिक सेन्सेशन साई अभ्यंकरने कंपोज केलेल्या या गाण्याची आधीपासूनच जोरदार चर्चा रंगली होती. जवळपास महिनाभरापूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याच्या थीमने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि पूर्ण गाणं ऐकण्याची उत्सुकता आणखीच वाढवली.
Jio IPO ने रचला इतिहास ; अवघ्या 100 मिनिटांत IPO पूर्ण सब्सक्राइब
या चित्रपटाच्या म्युझिकल प्रवासाची सुरुवात धनुषच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या पहिल्या गाण्याने, ‘अलाका लूवा’ने झाली होती. आपल्या कॅची बीट्स आणि धमाकेदार एनर्जीच्या जोरावर या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि बराच काळ ट्रेंडिंगमध्ये आपली जागा कायम ठेवली. पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता ‘वीझा वीरा’च्या माध्यमातून मेकर्स पुन्हा एकदा म्युझिकची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
साई अभ्यंकरच्या हाय-वोल्टेज म्युझिकल एनर्जीने सजलेलं ‘वीझा वीरा’ म्हणजे दमदार बीट्स आणि भन्नाट अंदाजाचा जबरदस्त तडका! हे गाणं ऐकल्यानंतर पाय आपोआप थिरकायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको. गाण्यातील जोश आणि एनर्जी चित्रपटाच्या भव्य सिनेमॅटिक विश्वाची झलकही दाखवते. दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेलं हे विश्व प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे.
जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा पुण्यातून ताब्यात; घरमालकानेच ओळखलं आरोपीचं कृत्य
गाण्याबद्दल बोलताना आरटेक स्टुडिओजच्या फाउंडर आणि चित्रपटाच्या निर्मात्या श्रद्धा अग्रवाल म्हणाल्या, “‘अलाका लूवा’ला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक होतं. लोकांनी केवळ हे गाणं पसंत केलं नाही, तर ते सतत ट्रेंडिंगमध्ये राहिलेलं पाहणं आमच्यासाठी खूप खास होतं. जेव्हा आम्ही ‘वीझा वीरा’ची थीम रिलीज केली, तेव्हा श्रोत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून त्यांना पूर्ण गाणं ऐकण्याची किती उत्सुकता आहे, हे स्पष्ट झालं. प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण करायची आमची इच्छा होती आणि आता संपूर्ण गाणं त्यांच्या भेटीला आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साईने एक अतिशय भन्नाट आणि एक्सायटिंग गाणं तयार केलं आहे. प्रेक्षक या गाण्यावरही तितकंच, किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम करतील, अशी आम्हाला आशा आहे.”
राहुल गांधी व्हिएतनामहून परतताच देशात सत्तापरिवर्तन; संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
राजकुमार पेरियासामी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘ओम: चैप्टर 1: उधिरम – द ब्लड वुड’ या चित्रपटात धनुष आणि मल्याळम सिनेमातील दिग्गज अभिनेते ममूटी यांच्यासोबत साई पल्लवी, श्रीलीला, नसीरुद्दीन शाह आणि इंद्रन्स यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. आरटेक स्टुडिओजच्या प्रेझेंटेशनअंतर्गत आणि वंडरबार फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती श्रद्धा अग्रवाल, धनुष आणि अजमत जगमग यांनी केली आहे. श्रेयस श्रीनिवासन आणि संदेश अग्रवाल सहनिर्माते असून, विशु रामास्वामी यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसरची जबाबदारी सांभाळली आहे.
थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला पण … जरांगेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
आधी ‘अलाका लूवा’च्या तालावर प्रेक्षकांनी ठेका धरला आणि आता प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीवर रिलीज झालेलं ‘वीझा वीरा’ चित्रपटाची क्रेझ आणखी वाढवण्यासाठी सज्ज आहे. या भव्य मल्टीलिंग्वल चित्रपटाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून, 20 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये दाखल होणार आहे.
