ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते आणि काही दिवसांपासून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Letsupp Image   2025 11 24T133153.914

Letsupp Image 2025 11 24T133153.914

Bollywood’s Iconic ‘He-Man’ Dharmendra dies at 89 : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. “ही-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरीदेखील सोडण्यात आले होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत आयएनएस वृत्तसंस्थेने ट्विट केले असून, त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  

धर्मेंद्र यांच्या काही निवडक चित्रपटांची यादी

शोले (1975)
सीता और गीता (1972)
अमर अकबर अँथनी (1977)
घायल (1990)
चुपके चुपके (1975)
बेंजामिन (1974)
आला रे आला (1974)
आल दिगारा (1976)
दिल भी तेरा हम भी तेरे (1960) – या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.

धर्मेंद्र यांची 65 वर्षांची कारकीर्द
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ते “दिल भी तेरा हम भी तेरे” मध्ये दिसले. यानंतर 1961 मध्ये आलेल्या ‘बॉय फ्रेंड’ चित्रपटात सहाय्यक भूमिकेत धर्मेंद्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. साधारण 65 वर्षे अभिनय क्षेत्रात काम करताना धर्मेंद्र यांनी अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973) यादों की बारात (1973) सारखे चित्रपट केले आहे.

धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट:

धर्मेंद्र आता या जगात नाहीत, पण ते लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. धर्मेंद्र यांचा एक चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, ज्यात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असून, “इक्कीस” असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात धर्मेंद्र अगस्त्य नंदाच्या वडिलांची भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य

धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. या लग्नापासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल अशी चार मुले आहेत. तर, धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झाले आहे. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

Exit mobile version