Download App

Manik Bhide Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

Calssical Singer Manik Bhide: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Singer Manik Bhide) यांचं काल निधन झालं आहे. वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Manik Bhide Passed Away)
माणिक भिडे यांच्या निधनाची माहिती मिळताच संगीत क्षेत्रामध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

माणिक भिडे यांनी अनेक प्रसिद्ध गायक आणि गायिकांना आपल्या तालिमीमध्ये घडवले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. माणिक भिडे या मूळचे कोल्हापुरचे आहेत. गोविंदराव भिडे यांच्याशी लग्न झाल्यावर त्या मुंबईमध्ये आले होते.

गोविंदराव भिडे यांच्या घरी देखील संगीताचे वातावरण होते. यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळींचा सुनेने देखील गाणेच करावे, असा हट्ट पकडला होता. गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या सर्वश्रुत शिष्या म्हणून त्यांची पहिली १७ वर्षांची कारकीर्द घडली आहे.

Marathi Serial : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर एन्ट्री; नाटक लवकरच येणार

यानंतर माणिक भिडे यांनी कन्या अश्विनी भिडे- देशपांडे यांच्यासह इतर अनेक शिष्यांना तालीम देत स्वतःला गुरू म्हणून घडवले आहेत. यात माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे यासह अनेक गायकांना त्यांनी चांगलच घडवलं आहे. त्यांना आजारपण आणि वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us