Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला

Sam Bahadur Date Out: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्या काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur ) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. चाहते देखील विकीच्या या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर शेअर करत असतो. याअगोदर देखील त्याने या सिनेमातील त्याचा लूक […]

Sam Bahadur Date Out

Sam Bahadur Date Out

Sam Bahadur Date Out: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्या काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur ) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. चाहते देखील विकीच्या या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर शेअर करत असतो. याअगोदर देखील त्याने या सिनेमातील त्याचा लूक पोस्ट केला होता आणि त्यानंतर या सिनेमाच्या तयारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवला होता. तेव्हापासून हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं होतं. अखेर आज या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख प्रदर्शित करण्यात आली आहे.


विकीने आज या सिनेमाचा एक टीझर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या टीझर मध्ये विकी सॅम माणेकशॉ यांच्या वेशभूषेमध्ये सैनिकांच्या रांगेतून चालत जात असल्याचे बघायला मिळत आहे. या टीझरच्या शेवटी “१ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात…” असं लिहिलेलं दिसत आहे.

हा टीझर पोस्ट करत असताना विकीने लिहिलं आहे की, ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा १ डिसेंबर २०२३ दिवशी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.” गेल्या अनेक महिने तो या चित्रपटावर काम करत आहे. काही मिनिटांतच हा टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विकीचे चाहते या पोस्टवर कमेंट करत या सिनेमाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?

सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटामध्ये विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत. सान्या सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची, तर फातिमा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.

Exit mobile version