Vidya Balan On Nepotism: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधीही (Prateek Gandhi) दिसणार आहे. अभिनेत्रीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्याही तिच्या संघर्षाबद्दल अनेकदा बोलताना दिसत असते. आता विद्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करताना दिसत आहे.
विद्या बालनचा समावेश अशा अभिनेत्यांच्या यादीत आहे ज्यांनी गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत येऊन स्वत:चे नाव कमावले. विद्याला तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत ओळख मिळाली आहे. आता अभिनेत्रीने घराणेशाहीबाबत वक्तव्य केले आहे.
विद्या बालन नेपोटिझमबद्दल काय म्हणाली?
विद्याने नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. यादरम्यान, घराणेशाहीच्या प्रश्नावर तिने थेट प्रतिक्रिया दिली आहे , म्हणाली की याचे उत्तर कसे द्यावे हे मला कळत नाही, कारण मी माझं काम उत्तम करत असून या कामातून मला समाधान मिळत आहे. मुळात इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. कोणीही कधीही इंडस्ट्रीत येऊन काम करू शकतो.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, मी स्वतःचे काम करून आनंदी आहे. मला अनेकवेळा वाटले की कदाचित मला काही लोकांची साथ मिळाली असती तर त्या टप्प्यात लोक थोडे अधिक दयाळू झाले असते. पण मला वाटतं की खरंच काही फरक पडत नाही.
या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
यापूर्वीच्या नात्यात विद्याची फसवणूक झाली होती
यादरम्यान विद्याने तिच्या हृदयविकार आणि पूर्वीच्या नात्याबद्दलही सांगितले. पहिल्या नात्यात आपली फसवणूक झाल्याचे तिने उघड केले. अभिनेत्री म्हणाली, माझी फसवणूक झाली. मी डेट केलेल्या पहिल्या माणसाने माझी फसवणूक केली. ते खूप वाईट काळ होता.
‘दो और दो प्यार’ या दिवशी प्रदर्शित होणार
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विद्या बालन प्रतीक गांधीसोबत ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे. या चित्रपटात इलियाना डिक्रूझ देखील आहे. हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विद्या ‘भूल-भलैया 3’ मध्येही दिसणार आहे.