विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी 2’ने रचला इतिहास ZEE5 वर सर्वात मोठ्या ओपनिंगसह जगभरात नंबर 1!

The Kerala Story 2 च्या यशानंतर, विपुल अमृतलाल शाह यांनी पुन्हा एकदा ‘द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड’च्यातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Vipul Amrutlal Shah’s ‘The Kerala Story 2’ creates history with the biggest opening on ZEE5, becoming No. 1 worldwide : ‘द केरला स्टोरी’च्या विक्रमी यशानंतर, विपुल अमृतलाल शाह यांनी पुन्हा एकदा ‘द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड’च्या माध्यमातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित आणि सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तीन अशा महिलांची कथा सांगतो, ज्या आपल्या धर्माबाहेर लग्न केल्यानंतर एका शोषणात्मक कटाचा बळी ठरतात.

भाजपने फसवून 100 जागा लुटल्या, मला काढा, राजीनामा देणार नाही; ममतांनी बैठकीत काय-काय म्हटलं?

थिएटर रिलीजदरम्यानच या चित्रपटाने मोठी चर्चा निर्माण केली होती, आणि आता ZEE5 वर रिलीज झाल्यानंतर त्याने OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने सर्वात मोठी वीकेंड ओपनिंग नोंदवली असून तो जगभरात नंबर 1 वर ट्रेंड होत आहे.

आम्ही जनतेच्या कौलाच्या विरोधात जाणार नाही; डीएमकेने फेटाळला एआयडीएमकेचा युतीचा प्रस्ताव

‘द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड’च्या ZEE5 वरील प्रीमियरनंतर प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या यशाचा आनंद साजरा करताना निर्मात्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, या चित्रपटाने 110 मिलियनपेक्षा जास्त वॉच मिनिट्ससह ZEE5 वर सर्वात मोठी वीकेंड ओपनिंग मिळवली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले.

हा खून पूर्ण पूर्वनियोजित, भाजप या गुंडांना… पीएच्या हत्येनंतर अधिकारी भडकले तर हल्ल्यानंतर टीएमसीची मोठी मागणी

‘द केरला स्टोरी’ने आपल्या धाडसी कथेमुळे देशभरातील प्रेक्षकांना हादरवून टाकले होते. त्याच्या पुढील भागात ही कथा आणखी पुढे नेली आहे—आराम, शांतता आणि नकार यापलीकडे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह असून सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली आशिम ए. शाह यांनी सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Exit mobile version