Download App

Anushka Sharma: विराट अन् अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?

Anushka Sharma: बॉलिवूडसोबतच (Bollywood) क्रीडा क्षेत्रातील सर्वांची लाडकी जोडी म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohali) या दोघांना ओळखले जात असते. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच उत्सुक शिगेला पोहचलेली असते.


आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तीन जणांचा असलेला कोहली परिवार आता चौथ्या पाहुण्यांचा आगमन होणार आहे. अनुष्का, विराट आणि वामिकाच्या आयुष्यामध्ये आता नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा ही पुन्हा एकदा प्रेग्नंट झाल्याचे बघायला मिळत आहे. विराट आणि अनुष्काच्या आयुष्यामध्ये आता पुन्हा एकदा नव्या पाहु्ण्याचे आगमन होणार आहे.

अनुष्काची डॉक्टरकडे ट्रीममेंट सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विराट आणि अनुष्का लवकरच याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अलीकडे येणे टाळत असल्याचे बघायला मिळत आहे. त्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. परंतु आता या गोष्टीला कारण देखील समोर आहे आहे. ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात आहे.

Khichdi 2 Teaser: दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके, ‘खिचडी 2’ चा टीझर प्रदर्शित

तसेच नुकताच विराट आणि अनुष्का मॅटरनिटी क्लिनिकमध्ये बघायला मिळाले होते. त्यांनी फोटोग्राफरला फोटो शेअर करु नका अशी विनंती देखील केल्याचे समोर आले आहे. तसेच लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे देखील वचन दिल्याचे सांगितले जात आहे.  अनुष्का आणि विराटने अजून देखील मुलगी वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. त्यांनी मीडियाला विनंती केली होती, कृपया आमच्या मुलीचा चेहरा दाखवू नका.

विराटने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे की, ‘आम्ही आमच्या मुलीचा चेहरा दाखवायचा नाही, हे ठरवले आहे. ती जेव्हा मोठी होईल आणि सोशल मीडियावर येण्यास तयार होईल, त्यावेळेस तिचा चेहरा आम्ही समोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अनेकवेळा विराट आणि अनुष्का मुलीबरोबर असतात, तेव्हा तिचे फोटो काढू नका अशी विनंती ते कायम करत असल्याचे बघायला मिळत असते.

follow us