Download App

Vivek Agnihotri यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, महाभारतावर 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार’

Vivek Agnihotri Announced Parva: ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ सारखे सिनेमा बनवणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितले आहे की, महाभारतावर (Mahabharata) आधारित 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार हाती घेतला आहे.


विवेक अग्निहोत्रीसाठी हे ‘पर्व’ महत्त्वकांक्षी सिनेमा असणार आहे. ख्यातनाम कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांनी लिहिलेल्या ‘पर्व’ कादंबरीवर आधारित हा सिनेमा राहणार आहे. 3 भागामध्ये सिनेमाची मालिका करण्याचा निश्चय त्यांनी हाती घेतला आहे. विवेक यांनी सोशल मीडियावर ‘पर्व’ फ्रँचाइजीचे 3 सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं आहे. या फ्रंचाइजीची निर्मिती विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी करणार आहे.

तसेच प्रकाश बालेवाडी ‘पर्व’ सिनेमाचं सह लेखक म्हणून काम करणार आहेत आणि कादंबरीचे मुळ लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, पद्मश्री एस एल भैरप्पा करणार आहेत. एस एल भैरप्पा यांच्या कन्नड भाषेतील गाजलेल्या कादंबरीचं या सिनेमात रुपांतर असणार आहे. ही कादंबरी संस्कृत भाषेतील महाकाव्य महाभारत ग्रंथावर आधारित आहे. भैरप्पा यांचे कार्य आधुनिक क्लासिक म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या ‘पर्व’सह इतर अनेक साहित्याला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आहे.

Shilpa Shetty दिसणार लेडी कॉपच्या भूमिकेत; ओटीटीवर डेब्यू करण्यास सज्ज

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवर सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. महाभारतावर आधारित भव्य सिनेमा निर्मिती करण्याचा निर्णय विवेक अग्निहोत्री यांनी घेतला. हे शिवधनुष्य ते कसं पेलणार हे आगामी काळात बघायला मिळणार आहे. विवेक अग्निहोत्री यांना नुकताच त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विवेक अग्निहोत्रीनं पुरस्कार स्वीकारला.

Tags

follow us