Coming home : वॉर्नर म्युझिक इंडिया आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते महावीर जैन (Mahavir Jain) यांची निर्मिती असलेलं कमिंग होम हे अँथम 29 सप्टेंबरला अमेरिकेत लॉंच करण्यात आलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar), अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, मानुषी छिल्लर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मिस युनिव्हर्स हरनाज कौर यांनी हे कमिंग होम गीत लॉंचं केलं. हे गीत जागतिक शांतता या थीमवर आधारीत आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हलमध्ये ‘कमिंग होम’ – द वर्ल्ड पीस अँथम लाँच करण्यात आले. अतिशय अनोख्या पध्दतीनं हे गीत लॉंच झालं. ग्लोबल हार्मनीच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
तेलंगणा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’; 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा
यात 100 हून अधिक देशांतील लोकांनी हजेरी लावली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या जागतिक संस्कृती महोत्सवात 1 दशलक्षाहून अधिक लोक एकत्र आले. त्यावेळी भारतीय कलाकारांनी हे अॅंथम लॉंच केलं.
यावेळी महावीर जैन यांनी संगीत क्षेत्रात आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या चार धडपड्या संगीत कलाकारांची ओळख करून दिली आहे. ‘कमिंग होम’ – द वर्ल्ड पीस अँथम हे 18 वर्षीय दिव्यांश जैन आणि त्याचे मित्र रोहन पंडित, अबीर पंडित आणि नील खोसला यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे, तर वॉर्नरने त्याची निर्मिती केली आहे.
करण जोहर, जॅकलीन फर्नांडिस, मानुषी छिल्लर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मिस युनिव्हर्स हरनाज कौर यांच्यासह मोठ्या अनेक मोठ्या कलाकारांनी या तरुण प्रतिभावान गायकांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचं कौतूक केलं. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या तरुणांचं हे गीत शेअर केले. वॉर्नर म्युझिक इंडियातर्फे हे अॅंथम जागतिक स्तरावर वितरण केले जात आहे.
‘कमिंग होम’ हे एकता आणि शांतीची भावना निर्माण करते. वॉर्नर म्युझिक हे अॅंथम जगभर रिलीज करत आहे. हे अॅंथम महावीर जैन आणि भारतातील काही मोठ्या चित्रपट निर्मात्यांच्या मोठ्या ‘न्यूकमर्स इनिशिएटिव्ह’चा भाग आहे.