Welcome to Jungle teaser released an explosion of comedy, chaos and non-stop laughter : प्रेक्षकांची उत्सुकता अखेर संपली असून वेलकम टू द जंगल या बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा वेडसर गोंधळ, धमाल प्रसंग आणि खळखळून हसवणाऱ्या दुनियेची झलक दाखवली आहे. अनेक दिवसांपासून चाहत्यांना ज्या मनोरंजनाची प्रतीक्षा होती, ती आता या चित्रपटातून पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.
19 मेच्या मध्यरात्री प्रदर्शित होणार एनटीआर – नीलचा बहुप्रतीक्षित व्हिडीओ, 5 भाषांमध्ये होणार रिलीज
अक्षय कुमारच्या स्टायलिश पोस्टरनंतर आता टीझरनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय पुन्हा एकदा त्याच्या लोकप्रिय विनोदी भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. टीझरमध्ये जुन्या आठवणी जाग्या करणारे प्रसंग, परिचित चेहरे आणि ‘वेलकम’ फ्रँचायझीचा खास विनोदी अंदाज पाहायला मिळतो.
‘राजा शिवाजी’ तिसऱ्या आठवड्यात दमदार कामगिरीसाठी सज्ज; आतापर्यंत 84.70 कोटींची कमाई
हा चित्रपट पूर्णपणे गोंधळ, धमाल आणि हसण्याने भरलेला आहे. प्रत्येक वळणावर काहीतरी मजेशीर घडणार असल्याची झलक टीझरमधून दिसते. अधिक कलाकार, अधिक गैरसमज, अधिक कॉमेडी आणि न थांबणारे मनोरंजन अशा तडफदार स्वरूपात हा चित्रपट सादर होणार आहे. गंभीर सिनेमांच्या वातावरणात प्रेक्षकांना एक हलकी-फुलकी, कुटुंबासोबत आनंद घेण्यासारखी मेजवानी देण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे.
चित्रपटातील प्रत्येक पात्र कधी शिकारी, कधी प्रेक्षक तर कधी स्वतः शिकार बनताना दिसते. त्यामुळे संपूर्ण कथा एका भन्नाट रोलरकोस्टरसारखी वाटते. विशेष म्हणजे, अक्षय कुमार पुन्हा त्या शैलीत परतला आहे, ज्यात प्रेक्षकांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. हेच या चित्रपटाचे मोठे आकर्षण ठरत आहे.
निवडणुकीत तोंडावर आपटले ते अपयश झाकण्यासाठी… मंत्री विखेंचा मोदींवरील टीकेवरून विरोधकांना टोला
जुन्या आठवणींना भव्य कॉमेडीच्या स्केलवर आणणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पैसा वसूल अनुभव देणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते. मित्रमंडळी, कुटुंब आणि संपूर्ण ग्रुपसोबत पाहण्यासाठी हा एक परिपूर्ण मनोरंजनपट ठरणार आहे. चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूरआणि राजपाल यादव यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. अहमद खान दिग्दर्शित या क्षेत्राचे निर्माते फिरोज ए. नाडियादवाला आहेत. 26 जून रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना धमाल कॉमेडीचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
