Download App

बरं झालं ओळखलं तरी, सनी देओलच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

अहमदनगर : बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात सुरू होत. यावेळी अनेकांनी आपली सनी देओल यांना भेटण्याची इच्छा पुर्ण केली. पण याच चित्रीकरणादरम्यान बॉलिवूडचे अभिनेते सनी देओल हेच थेट एका शेतकऱ्याला भेटले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ अभिनेते सनी देओल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. बरं झालं ओळखले ते तरी… असं म्हणत एकाने मस्करी केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या शेतकऱ्याच्या हिंदी भाषेचे कौतुक केले आहे. तरअनेक चाहत्यांनी असे देखील म्हटले आहे की, ‘एवढा मोठा हिरो अजूनही माणसात आहे. काही भंगार लोक साधा 1 पिक्चर काढून त्यांना गुर्मी येते स्वतः ला काय समजतात ते काय माहित हिरो सनी देओल सारखा पाहिजे.’

या व्हिडीओमध्ये सनी देओल यांनी एका शेतकऱ्याशी संवाद साधला आहे. यावेळी विशेष म्हणजे अचानक थेट अभिनेता सनी देओलला पाहून या शेतकऱ्याने त्यांना ओळखले नाही. त्याने सनीला विचारले की, तुम्ही सनी देओलसारखे दिसता. त्यावर सनी देओलले सांगितले की, मी सनी देओलच आहे. त्यावर शेतकरी आवाक् झाला. सनी यांनी त्या शेतकऱ्याची विचारपूस केली. त्याच्याशी संवाद साधला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलच्या ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. ‘गदर 2’ हा 2001 ला आलेल्या आणि अत्यंत सुपरहीट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात देश भक्ती बरोबरच एक प्रेमकथा होती.

Parineeti Chopra : इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चं शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर म्हणाले…

आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज देखील या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना अभिनेता सनी देओल म्हणाला की, ‘ गदर – एक प्रेम कथा’ हा माझ्या आयुष्याचा, वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या एक महत्त्वाचा भाग आहे. गदरमधला तारा सिंग हा केवळ एक नायक नाही. तर तो एक कल्ट आयकॉन बनला ज्याने सर्व अडचणींना झुगारून दिले आणि आपल्या कुटुंबासाठी आणि प्रेमासाठी सर्व सीमा ओलांडल्या. 22 वर्षांनंतर या सर्व टीमसोबत काम करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.

या चित्रपटाचं काही सीन्सच चित्रीकरण अहमदनगर शहरात करण्यात आले आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक आणि निर्मिते अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. तर हा चित्रपट झी स्टुडिओजने निर्मीती केली आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल आणि उत्कर्षा शर्मा हीची मुख्य भूमिका आहे. तर हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 ला रिलीज होणार आहे.

Tags

follow us