‘The Kerala Story’चा वाद पेटला, ‘या’ राज्याने थेट सिनेमावरच घातली बंदी 

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सिनेमाच्या कथानकावर काही लोकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T102637.221

The Kerala Story

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सिनेमाच्या कथानकावर काही लोकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी या निर्णयाबद्दल यावेळी सांगितले आहे. पश्चिम बंगाल सरकारने (Govt) ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) म्हणजे नेमकं काय? हा सिनेमा लोकांच्या एका सेक्शनचा अपमान करतो. तसेच ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे नेमकं काय आहे? तर ही विकृत कथा आहे, असे यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. पश्चिम बंगाल सरकारने ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर बंदी घातल्यावर या सिनेमाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

या पत्रकार परिषेदेमध्ये विपुलने सांगितले आहे की,’बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू’ अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

काय आहे नेमका सिनेमाचा वाद?

दरम्यान केरळमध्ये लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामधून दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामुळे या सिनेमाचा मोठा वाद निर्माण झाला आहे.

Exit mobile version