‘The Diary of West Bengal’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला पोलिसांनी बजावली नोटीस

The Diary of West Bengal: द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) सिनेमाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चांगलेच रणकंदन माजवले आहे. ते कमी होते न होते तोच ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या सिनेमाचा वाद सुरु केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 26T153230.775

The Diary of West Benga

The Diary of West Bengal: द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) सिनेमाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चांगलेच रणकंदन माजवले आहे. ते कमी होते न होते तोच ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या सिनेमाचा वाद सुरु केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी (Bengal Police) या सिनेमाच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे.

यामुळे हा सिनेमा ट्रेलर रिलीज होताच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. सिद्ध सिनेमा निर्माते सनोज मिश्रा हे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहात आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41A अन्वेय पाठवलेल्या नोटीशीमध्ये ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सिनेमातून राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोटीसनुसार सिनेमाच्या दिग्दर्शकाला येत्या 30 मे रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सिनेमाची कथा रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी अतिरेकी यांच्या वस्तीभोवती फिरते. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी पश्चिम बंगालमध्ये समुदायाचा झपाट्याने कसा वापर केला आहे, हे दाखवण्यात आले आहे. सिनेमाद्वारे बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आजूबाजूला झालेल्या गोंधळामुळे हा सिनेमा सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नोटीसमध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, तुम्हाला (दिग्दर्शक) 30 मे 2023 रोजी एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशनचे अतिरिक्त प्रभारी अधिकारी इंस्पेक्टर सुभब्रत कार, 56, एम्हर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशन, राजा राम मोहन यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सरानी, कोलकाता-9 वरील संदर्भित प्रकरणाच्या तपासाच्या हेतूने. प्रभारी निरीक्षक, ओशिवरा पोलीस स्टेशन, मुंबई यांना नोटीस बजावण्यासाठी आणि रिटर्न सिग्नलद्वारे सेवेची माहिती देण्यासाठी करण्यात आले आहे. दरम्यान वादग्रस्त सिनेमा वसीम रिझवी फिल्म्सने प्रस्तुत केला आहे आणि जितेंद्र नारायण सिंग निर्मित आहे. तपस मुखर्जी आणि अचिंत्य बोश सह-निर्माते म्हणून काम करत आहेत.

Exit mobile version