Download App

फार्महाऊसवर सतीश कौशिक नेमके कधी पोहचले? तिथं त्यांच्यासोबत काय झालं?; पोलिसांकडून तपास सुरू

  • Written By: Last Updated:

ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी काल रात्री वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. दरम्यान, कौशिक यांनी निधनाच्या एक दिवस आधी आपल्या निकटवर्तीयांसोबत होळी साजरी केली होती. मात्र, काल रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, डॉक्टर कौशिक यांना वाचवण्यात अपयशी ठरले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. दरम्यान, आता कौशिक यांच्या अचानक निधनानंतर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) त्याचा तपास सूरू आहे. कौशिक यांचा मृत्यू का आणि कशामुळे झाला? त्यांच्यासोबत शेवटच्या क्षणी कोण मित्र-मंडळी होती, याचीही चौकशी केली जात आहे.

कौशिक यांनी निधनापूर्वी मित्र आणि कुटूंबियांसोबत होळीचा सन साजरा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी 7 मार्चला ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मुंबईतील घरात होळी साजरी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अन्य निकटवर्तीय मित्र-मंडळी देखील होती. त्यात अभिनेत्री महिमा चौधरी, गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री ऋचा चड्डा, अली फजल हे उपस्थित होते. यावेळचा फोटो देखील कौशिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. या मित्रांसोबत होळीचा आनंद एन्जॉय केल्यानंतर कौशिक हे 8 मार्चला दिल्लीत आपल्या कुटूंबासह होळी साजरी करण्यासाठी गेले होते. ते तिथे फॉर्महाऊसवर होळी खेळण्यास गेले होते. तिथे रात्री 11 वाजता त्यांची तब्येत ढासाळली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. कौशिक यांचा वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, रात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी सुरू?
कौशिक यांच्या निधनानंतर त्याची मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिनदयाल रूग्णालयात नेण्यात आला होता. आता पोलिसांकडूनही कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येत आहे. सुरुवातीच्या तपासात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पण आता अभिनेत्याची फार्महाऊसवरच तब्येत बिघडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कौशिक यांची तब्येत ज्या फार्महाऊसवर खालावली होती, त्या फॉर्महाऊसवर कौशिक कधी पोहोचले होते? आणि तिकडे काय-काय झालं होतं. इतकंच नाही तर ज्या लोकांनी त्यांना रूग्णालयात दाखल नेले होते, त्यांच्या पोलीस संपर्कात असून चौकशी करत आहेत. ॉ

Jadeja Bowled Smith: स्टीव्ह स्मिथला चकमा देत जडेजाने केले बोल्ड, पाहा व्हिडिओ

पोस्टमार्टम काय सांगतो?
सतीश कौशिक यांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. दिल्लीच्या हरिनगर दीनदयाल रुग्णालयाच्या मेडिकल तज्ज्ञांकडून सतीश कौशिक यांच्यावर पोस्टमोर्टम करण्यात आले. यात कौशिक यांच्या शरीरावर जखमेचे निषाण सापडले नाही आहेत. तसेच त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचं सांगण्यात आलं. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरही पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

त्यामुळे या तपासात काय समोर येतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us