TikTok Star Riyaz Ali : मिलियन फॉलोअर्स असलेला रियाज अली नेमका आहे कोण?

मुंबई : टिक टॉक स्टार रियाझ अली सध्या चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असो किंवा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा डान्स… नुकताच अमृता फडणवीस यांच्यासोबत डान्स करत असलेला रियाझचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. अल्पवधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला रियाझ अली आहे तरी कोण? हे आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ […]

Untitled Design (14)

Untitled Design (14)

मुंबई : टिक टॉक स्टार रियाझ अली सध्या चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असो किंवा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा डान्स… नुकताच अमृता फडणवीस यांच्यासोबत डान्स करत असलेला रियाझचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. अल्पवधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला रियाझ अली आहे तरी कोण? हे आज आपण जाणून घेऊया.
YouTube video player
तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ पाहणे आवडत असेल, तर तुम्ही टिक टॉक स्टार रियाझ अलीला नक्कीच पाहिले असेल, आपल्या हेअर स्टाइलने लाखो लोकांची मने जिंकणारा रियाझ अली याने खूप कमी वयात हे यश मिळवले आहे.

रियाझ अली हा भारतातील टॉप टिक टॉक स्टार आहे. त्याचा जन्म 27 ऑक्टोबर 2003 रोजी भूतानमध्ये झाला होता. हा भारतातील सर्वात तरुण टिक टॉक स्टार आहे ज्याचे टिक टॉकवर 43.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तसेच टिक टॉकवर 10 दशलक्ष आणि 25 दशलक्ष फॉलोअर्स मिळवणारा हा सर्वात वेगवान टिक टॉकर आहे.

रियाझ अलीचे खरे नाव रियाझ आफरीन आहे. टिकटॉक व्यतिरिक्त, रियाझ अलीने यारी है, पहाडन आणि सुपरस्टार सारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केले आहे. आधिक माहितीनुसार रियाझ अलीची 2020 पर्यंतची एकूण संपत्ती सुमारे $0.8 दशलक्ष आहे. वयाच्या 14 व्या वर्षी रियाझचे वजन खूप वाढले होते. रियाझ अलीचेही वजन 90 किलो होते. मात्र, तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून मेहनत घेत आहे. त्याची मेहनतही दिसून येते.

रियाझ अलीची कमाई…
रियाझ अली एका महिन्यात सुमारे 20 लाख रुपये कमावतो. त्याची सर्वाधिक कमाई जाहिरातीतून होते. त्याच्या टिकटॉक अकाउंटवर 27 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे त्याचे इंस्टाग्रामवर 6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Exit mobile version