कोण आहे ? ‘बिग बॉस मराठी’ चा महाविजेता अक्षय केळकर

मुंबई : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. अक्षय केळकरला 15 लाख 55 हजार इतकी धनराशी आणि ट्रॉफी मिळाली. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देखील मिळाले. हा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता […]

Untitled Design (31)

Untitled Design (31)

मुंबई : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. अक्षय केळकरला 15 लाख 55 हजार इतकी धनराशी आणि ट्रॉफी मिळाली. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देखील मिळाले. हा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर अक्षय केळकरने एक खास पोस्ट लिहित चाहत्यांचे आभार मानले. अक्षयने लिहिलं आहे,”हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालोय!”.

8 जानेवारी 2023 – बिग बॉस मराठीचा 100 दिवसांचा प्रवास आज संपला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली.

प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. बिग बॉस मराठीच्या या सिजनमध्ये सदस्य 100 दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली.

आता पाहुयात ‘बिग बॉस मराठी’ चा महाविजेता अक्षय केळकर कोण आहे ? 2013 साली अक्षयने ‘बे दुने दहा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर कलर्स मराठीवरील ‘कमला’ मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडे ही भूमिका प्रचंड गाजली. तर ‘प्रेमसाथी’ या चित्रपटातून अक्षयने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर अवधूत गुप्तेंच्या ‘कान्हा’ या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. ‘कॉलेज कॅफे’ या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. सब टीव्हीच्या ‘भाखरवडी’ या हिंदी मालिकेत देखील त्याने काम केलं आहे. तसेच अक्षयची ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी आहे.

Exit mobile version