Reality Show : सिद्धार्थ जाधवने का मानले सर्वांचे आभार ?

मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी रिअ‍ॅलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. आता हा कार्यक्रम संपण्याच्या टप्प्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधवने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. त्याने एक फेसबुक पोस्ट करत हे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणाला… ‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव, मनापासून तु्म्हा सर्वांचे आभार! मानतोय! […]

Untitled Design   2023 02 13T173429.395

Untitled Design 2023 02 13T173429.395

मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी रिअ‍ॅलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. आता हा कार्यक्रम संपण्याच्या टप्प्यात आला आहे. यावेळी सिद्धार्थ जाधवने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. त्याने एक फेसबुक पोस्ट करत हे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणाला…

‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव, मनापासून तु्म्हा सर्वांचे आभार! मानतोय! #AataHouDeDhingana खरंच माझ्या आयुष्यातलं एक वेगळंच धिंगाणा पर्व होतं.. सतीश राजवाडे सरांनी या शोसाठी विचारलं तो क्षण आणि त्यानंतर श्रीप्रसाद, सुमेध,चिन्मय कुलकर्णी , प्रतीकदा अदिदा, सागर, फ्रेम्सची संपूर्ण टिम यांनी सगळ्यांनी मिळून एक सुंदर शो बांधलाएक नाव सुचलं आणि हा धिंगाणेबाज कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.’

Upcoming Movie : ‘ही’ अभिनेत्री अवतरणार ‘फुलराणी’ च्या रूपात…

‘आज शेवटचा एपिसोड आहे, पण गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनेलवर हा शो प्रदर्शित झाला प्रसिध्द झाला आणि एक वेगळंच प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलं. मनापासून आभार मानतो रसिक प्रेक्षकांचे, ज्यांनी धिंगाणावर खूप प्रेम केलं आणि मी जो काय धिंगाणा घालत होतो. ते होस्टींग होतं की नाही माहीत नाही पण मी मनापासून काहीतरी करत होतो आणि ते तु्म्हाला आवडत होतं. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक कलाकाराचे आभार! प्रत्येक कॅमेरामन, टेक्निशियन, स्पॅाटदादांचे आभार! आणि मनापासून पुन्हा एकदा आभार स्टार प्रवाहचे की एका चांगल्या शोचा पार्ट होण्याची संधी मला दिलीत.’

‘Thank you everyone!सतीश राजवाडे श्रीप्रसाद क्षीरसागर @framesproductioncompany या शोने मला खूप काही दिलं. आनंद, प्रेम, विश्वास आणि धिंगाणा तर दिलाच! आणि Thank you माझ्या आई बाबाना या मंचावर आणलं.पहील्यांदा मी-स्वरा-ईरा एकत्र एका शोमध्ये आलो. ही one of the best moment आहे. माझ्या आयुष्यातली! So thank you ‘आता होऊ दे धिंगाणा’ team तुमचाच #आपला सिध्दू.’ असं म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version