सोनाली कुलकर्णीनं का मागितली माफी? सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni)एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झालाय. त्यामध्ये भारतीय मुली आळशी असल्याचं सोनालीनं म्हटलंय. सोनालीचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)झाल्यापासून ती सातत्यानं ट्रोल (Troll) होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता सोनालीनं तीच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्याबद्दल एक निवेदन जारी केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या […]

Sonali Kulkarani

Sonali Kulkarani

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni)एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झालाय. त्यामध्ये भारतीय मुली आळशी असल्याचं सोनालीनं म्हटलंय. सोनालीचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)झाल्यापासून ती सातत्यानं ट्रोल (Troll) होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता सोनालीनं तीच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्याबद्दल एक निवेदन जारी केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram)अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.

एकनाथ शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…

त्यात सोनालीनं म्हटलंय की, मला मिळालेल्या कमेंटसनं मी भारवून गेले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषतः संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छिते. मी स्वतः एक स्त्री असल्यामुळं इतर महिलांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी नेहमीच व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी का होईना पण वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.

पत्रात म्हटलंय की, मी माझ्या क्षमतेनुसार केवळ महिलांसोबतच नाही तर संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याचा, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण स्त्रिया शहाणपणानं निर्णय घेऊन आणि सक्षमपणे पुढे येऊ तेव्हाचच अधिक मजबूत होऊ असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

जर कळत नकळत माझ्या बोलण्यानं माझे कोणाचे मन दुखावले असेल, तर मी मनापासून माफी मागते. मला या प्रसिद्धीनं आनंद मिळत नाही किंवा मला अशा गोष्टीमुळं चर्चेत राहायला आवडत नाही. मी एक कट्टर आशावादी आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की, आयुष्य खरोखरच सुंदर आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे, असंही या पोस्टमध्ये सोनाली कुलकर्णीनं म्हटलं आहे.

Exit mobile version