Wrestlers Protest: ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि साक्षी मलिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू (International wrestler) भारतीय कुस्ती महासंघाने अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले आहे.
In solidarity with our wrestlers ✊🏻✊🏻@HMOIndia @ianuragthakur @SakshiMalik @Phogat_Vinesh @BajrangPunia @aajtak @ndtv @ZeeNews @republic @zee24taasnews @abpmajhatv @ANI @News18India pic.twitter.com/Ppvd2OVzGk
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) April 27, 2023
3 महिन्यांनंतर कुस्तीपटूंनी परत एकदा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. (Wrestlers Protest) जानेवारीमध्ये डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा, मानसिक छळाचा, डब्ल्यूएफआय निधीच्या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी यावेळी केला आहे.
क्रीडा मंत्रालयाने आंदोलक कुस्तीपटूंच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.
Janhvi Kapoor: इव्हेंटमधील ‘त्या’ ड्रेसमुळे जान्हवी कपूरला चाहत्यांनी सुनावलं, “म्हणाले…”
मात्र ती अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Actress Urmila Matondkar) यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आवाज उठवला आहे.