Dharmaveer 2: प्रवीण तरडेंकडून जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेऊन ‘धर्मवीर 2’ ची घोषणा

Dharmaveer 2: ‘धर्मवीर’ हा सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी सिनेमापैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावरील प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Marathi Movie) या सिनेमाला शिवसैनिकाही चांगला प्रतिसाद दिला होता. (Director Pravin Tarde) त्यानंतर आता लवकरच धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या […]

Dharmaveer 2

Letsupp Image 2023 08 09T111037.224

Dharmaveer 2: ‘धर्मवीर’ हा सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी सिनेमापैकी एक मानला जातो. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावरील प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Marathi Movie) या सिनेमाला शिवसैनिकाही चांगला प्रतिसाद दिला होता. (Director Pravin Tarde) त्यानंतर आता लवकरच धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नुकतंच निर्माते मंगेश देसाई आणि प्रवीण तरडेंकडून जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेऊन ‘धर्मवीर 2’ ची घोषणा करण्यात आली आहे.


तसेच मंगेश देसाई यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये मंगेश देसाई, प्रवीण तरडे हे जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेत असताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या हातामध्ये ‘धर्मवीर २’ सिनेमाचे पहिलं पोस्टर देखील बघायला मिळत आहे. यानंतर आता लवकरच धर्मवीर या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मंगेश देसाई यांची पोस्ट

“धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच…”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

 

‘धर्मवीर २’ या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर भगव्या रंगावर ‘धर्मवीर २’ असे लिहिण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याखाली ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईन देखील यावेळी देण्यात आली आहे. यामुळे हा सिनेमा हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार  असलयाचे सांगितले आहे. आता या सिनेमात कोण कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version